अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष विधानसभा(latest political news) निवडणुकीकडे लागलं आहे. अशातच आज भारत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण आज भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (15 ऑक्टो) दुपारी 3.30 वाजता भारत निवडणूक(latest political news) आयोगाकडून पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे आजच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे.
महाराष्ट्रासह झारखंड राज्याची देखील विधानसभा निवडणूक याच कालावधीत पार पडणार आहे. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर 2024 ला संपणार आहे. त्यामुळे या मुदतीच्या आधीच राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं अत्यंत आवश्यक आहे.
या सर्व बाबी लक्षात घेता आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता देखील लगेचच लागू होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक बैठका घेत मोठे निर्णय घेतले आहेत. कारण कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे राज्य सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
हेही वाचा:
विधानसभेचे तीन मतदारसंघ नेत्यांची प्रतिष्ठा “पणा” ला लागणार!
एआय वापरताना जीमेल लॉगिन केलंय? तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा स्कॅम;
विधानपरिषदेत क्रॉस व्होटींग केलेला ‘तो’ आमदार अजित पवारांच्या गळाला