कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मणिशंकर अय्यर, कधीकाळी केंद्रात कुठल्याशा खात्याचे मंत्री होते. मंत्री(minister) म्हणून तसेच काँग्रेसचा नेता म्हणून त्यांनी फार प्रभावीपणेदल काम केलेले आहे असे कोणीही म्हणणार नाही. त्यामुळे त्यांची कुणी दखल घेत नव्हते आणि आजही ती घेतली जात नाही. पण आपले नाव चर्चेत राहावे यासाठी ते कोणत्याही थराला जातात. केंद्रीय मंत्री असताना त्यांनी अंदमानचा दौरा केला. तेथील सेल्युलर जेलचे पर्यटन केले. या ऐतिहासिक जेलच्या समोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे छोटेसे स्मारक आहे. या महाशयांनी ते स्मारक उखडून टाकले.
ज्या जेलमध्ये सावरकरांनी अकरा वर्षे 23 दिवस शिक्षा(minister) भोगली त्यांची इतकी मोठी अवहेलना त्यांच्याकडून करण्यात आली. देशभरातून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी मनीशंकर अय्यर यांच्या कृतीचे काँग्रेस समर्थन करत नाही असा घाईघाईत खुलासा केला.
सुमारे चार ते पाच महिन्यापूर्वी त्यांना लाहोर मधील कुठल्या एका संस्थेने व्याख्यानासाठी बोलावले होते. तेथे भाषण करताना पाकिस्तान हा किती महान देश आहे, इथली जनता किती माणुसकीचा धर्म पाळते, पाकिस्तान वर भारत सरकारकडून किती अन्याय केला जातो, यावर त्यांनी केलेले भाष्य कदाचित तिथल्या जनतेलाही पटले नसावे. भारताबद्दल पाकिस्तान मध्ये कमालीचा आदर आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते भारताचे गुणगान गात असतात. त्या तुलनेत भारताकडून काही घडत नाही हे सांगायला सुद्धा त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्या मनी शंकर अय्यर यांच्या विरुद्ध भारतात संतापाची लाट उसळली होती.
पण तेव्हाही ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांनी सारवा सारव केली होती. पाकिस्तान बद्दल नुकतेच त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भारताने पाकिस्तान बद्दल आदर नव्हे तर भीती बाळगली पाहिजे. कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. भारताने आपली भूमिका बदलली नाही तर पाकिस्तान भारतात बॉम्ब फोडू शकतो असे भीतीच त्यांनी घातली आहे. एका मध्यमाला मुलाखत देताना त्यांनी हे आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत.
भारतात दहशतवादी कारवाया करतात म्हणून पाकिस्तानशी भारताने चर्चा बंद केलेली आहे. गेली दहा वर्षे, भारत पाकिस्तानची चर्चा करत नाही हे योग्य नाही. पाकिस्तान बद्दल अशीच भूमिका राहिली तर पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकू शकतो. असा इशाराच त्यांनी दिला आहे. वास्तविक पाकिस्तानमधील सनातन वाद्यांनी किंवा आयएएस या संघटनेने अशी भाषा केली असती तर त्याबद्दल काहीच वाटले नसते.
कारण पाकिस्तान कडून भारताबद्दल चार चांगले शब्द कधीच ऐकू येत नाहीत. तथापि मनी शंकर अय्यर या भारताच्या माजी केंद्रीय मंत्र्यांने अशी भीती घालावी हे मात्र संपातजनक आहे. हे पाकिस्तानचे नागरिक आहेत काय अशी शंका यावी.
तोंड उघडले की वादग्रस्तच बोलायचे अशी त्यांनी शपथच घेतलेली असावी. आत्ताच्या त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने काँग्रेस पक्ष ऐन निवडणूक काळात अडचणीत आलेला आहे. त्यांच्या या वक्तव्याची विरोधी पक्षाकडून अर्थात भारतीय जनता पक्षाकडून गांभीर्याने दखल घेतलेली आहे.
वास्तविक त्यांच्या या भारतालाच अणुबॉम्बच्या धमक्या देणाऱ्या वक्तव्याबद्दल काँग्रेसने त्यांना विना विलंब निलंबित करणे आवश्यक आहे. केवळ ते मनी शंकर अय्यर यांचे व्यक्तिगत मत आहे असा नेहमीसारखा बचाव काँग्रेसला करता येणार नाही. वास्तविक मनी शंकर अय्यर यांचे वादग्रस्त वक्तव्य हे केवळ आपले नाव चर्चेत राहावे यासाठीच असते. मध्यंतरी त्यांना एका शहरात लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
काँग्रेसचे आणखी एक नेते सॅम पित्रोदा असेच वादग्रस्त विधान करून सध्या चर्चेत आलेले आहेत. भारतामध्ये अमेरिकेप्रमाणे वारसा कर वसूल करण्यात यावा अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका करून, तुमच्या वारसा संपत्तीवर काँग्रेसचा डोळा असल्याचे सांगून लोकसभा निवडणुकीत तो एक प्रचाराचा मुद्दा केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचा अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यांनी तो राजीनामा दिला आहे. पण त्यांनी आणखी एक वंश विच्छेदक मत मांडले आहे. भारतातील पूर्वेकडचे लोक चिन्यासारखे दिसतात आणि उत्तरेकडचे लोक निग्रो दिसतात असे वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.
सॅम पित्रोदा यांनी जेव्हा वारसा कर लावण्यात यावा हा विचार मांडला तेव्हा ते काँग्रेसच्या इंडियन ओव्हरसीजचे अध्यक्ष असल्याचे भारतीयांना समजले. किंबहुना ते भारतात आहेत किंवा नाहीत हे सुद्धा भारतीयांना माहीत नव्हते. केवळ वादग्रस्त वक्तव्य करून मी अजूनही सक्रिय असल्याचे त्यांनी दाखवून दिले असले तरी त्यांना आपल्या पदाचा त्याग करावा लागला आहे.
हेही वाचा :
दहावी-बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट
काँग्रेसची अवस्था ‘घर का भेदी लंका ढाए’, बाहेरच्यांपेक्षा घरातल्यांमुळे काँग्रेसची अडचण
मोदी सरकार होणार मालामाल! रिझर्व्ह बँकेकडून मिळणार 1 लाख कोटी