शिक्षणाचे(education) माहेरघर म्हणल्या जाणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस फारच विचित्र घटना घडत आहेत. पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणाऱ्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. कधी रस्त्यावर गोळीबार, अपघातांचे वाढते प्रमाण तर कधी भरदिवसा केलेली हत्या यामुळे पुण्यात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात पुण्यातील कर्वेनगरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील(education) कर्वेनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत शुक्रवारी मध्यरात्री हत्या झाली आहे. कर्वेनगरमधील श्रीमान सोसायटीमधील एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक वाजता बुरखा घातलेल्या व्यक्तीने घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने वार करत एका व्यक्तीचा खून केलाय.
घरात कुटुंब उपस्थित असताना त्यांच्यासमोरच ही क्रूर हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर, हत्या केल्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन नराधम आरोपी प्रसार झाला. या घटनेमुळे पुणे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय42 ) असे या व्यक्तीचे नाव असून त्याची घरातच क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. राहुल निवगुंने यांचा दरवाजा अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री वाजविला. पुढे दरवाजा उघडताच त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले.
यादरम्यान राहुल निवगुंने यांनी आरडाओरडा केली. यानंतर त्यांच्या घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या. तोपर्यंत आरोपीने त्यांची हत्या केली होती. त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाला.
राहुल निवगुंने हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. आरोपींच्या तोंडावर बुरखा असल्याने मुलींना आरोपींना ओळखता आले नाही. आपल्या डोळ्यादेखत आपल्या वडिलांची हत्या करण्यात आल्याने मुलींना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या घटनेबाबत आता तपास सुरू आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:
सणासुदीच्या काळात सोनं देणार धक्का…
खंडपीठ मागणीसाठी पुन्हा एकदा एल्गार !
विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद; सरकारच्या निर्णयाची होतीये सर्वत्र चर्चा