अभिनेता सैफ अली वर हल्ला……घटना एक, प्रश्न मात्र अनेक

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : हिंदी चित्रपट (actor)अभिनेता सैफ अली खान याच्या निवासस्थानी प्रवेश करून एका गुन्हेगाराने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्यावर सहा वार करण्यात आले. या घटनेने प्रसार माध्यमात खळबळ उडाली.आणि गुरुवारपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत घरातील छोट्या पडद्यावर हा विषय सतत झळकत राहिला.

आम्ही या प्रकरणात कोणाही व्यक्तीला अद्याप अटक केलेली नाही हे (actor)मुंबई पोलिसांनी स्पष्ट करूनही संशयावरून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवर कॅमेराचा फोकस ठेवून हाच व्यक्तीचा हल्लेखोर असल्याचे वृत्तवाहिन्या सातत्याने सांगत होत्या. तपास अधिकाऱ्यांच्या पेक्षा एक पाऊल आम्ही पुढे आहोत असे वातावरण या वृत्तवाहिन्यांनी तयार केले होते. पोलिसांनी सुद्धा युद्धपातळीवर तपासा सुरू करून सेलिब्रेटीज च्या संदर्भात आम्ही किती तत्पर आहोत याचे दर्शन या निमित्ताने घडवले आहे.


सर्वसामान्य जनतेच्या वित्ताचे आणि जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची असून पोलीस दलाची निर्मिती त्यासाठीच केली आहे. पण”व्हिक्टिम” कोण आहे यावर पोलीस तपास अवलंबून असता कामा नये. प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असली पाहिजे.

साहेब अली खान (actor)याच्यावर त्याच्याच निवासस्थानी हल्ला होणे ही अतिशय गंभीर घटना आहे. त्याचा तपास अधिक गतीने होणे गरजेचेच आहे आणि तशी गती घेतली सुद्धा आहे. घटना घडल्यावर अगदी तातडीने 20 तपास पथके तयार केली जातात. तब्बल 40 तासांपेक्षा अधिक तास पथक तपास केला जातो आहे. पोलिसांनी पायाला भिंगरी लावली आहे.

पोलिसांच्या या जलद कृतीचे स्वागतच केले पाहिजे, कौतुक केले पाहिजे. पण हीच तत्परता सामान्य माणसावर अशी आपत्ती आल्यावरही दाखवली गेली पाहिजे. सैफ अली खान हा अभिनेता म्हणून नव्हे तर क्रिकेटपटू पतौडी, अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा आणि अभिनेत्री करीना कपूर हिचा पती म्हणूनच अधिक ओळखला जातो. साहेब आणि करीना यांनी त्यांच्या मुलाचे नाव ताईमुर ठेवले म्हणून कट्टरतावादी नाराज झाले होते.

त्या कट्टरवाद्यांनीच सैफवर हल्ला केला असावा अशी तातडीची प्रतिक्रिया देऊन, शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेला भगवा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक इतकी महत्त्वाची माहिती त्यांच्याकडे असेल तर तपास अधिकाऱ्यांनी त्यांचा तसा जबाब घेतला पाहिजे. किंवा या गुन्हेगारी घटनेला जातीय आणि धार्मिक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली पाहिजे. हीच टिप्पणी कोणी सामान्य व्यक्तीने मोबाईलवर व्हायरल केली असती तर पोलिसांनी त्याच्यावर तातडीने कारवाई केली असती.


दीड दोन महिन्यापूर्वी मुंबईच्या भांडुप परिसरातील संजय राऊत यांच्या बंगल्याजवळ रात्री मोटरसायकल वरून दोघेजण आले होते. ते त्यांच्या बंगल्याची रेकी करण्यासाठी आले होते असे समजून मीडियाने तशा बातम्या दिल्या होत्या. त्यावर संजय राऊत यांनी त्या दोघांना माझा संतोष देशमुख करायचा असेल अशी प्रतिक्रिया दिली होती.

नंतर ते मोटर सायकल वरील तरुण मोबाईल टॉवरची रेंज तपासणीसाठी तेथे आले होते हे स्पष्ट झाले. त्यामुळे अनेकांची बोलती बंद झाली. साइफ वर हल्ला करून पळून जाणाऱ्या तरुणाला सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. तेव्हा हीच व्यक्ती शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याची रेकी करत होता.

अशी माहिती मीडियाकडून देण्यात येऊ लागली. मुंबईत चित्रपट कलाकार सुरक्षित नाहीत असा आपण एक अप्रत्यक्ष संदेश देतो याचे भानही काहींना राहिले नाही. (actor)सैफ अली खान याच्यावर हेक्सा ब्लेडने सहा वार करण्यात आले अशी माहिती दिली जात होती, प्रत्यक्षात मात्र सैफ अली खान याच्या माने जवळच्या मणक्यात अडकून तुटून पडलेले चाकूचे पाते डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून अलगद बाहेर काढले. त्यात चाकूच्या तुटलेल्या पात्याचे फोटो मिळत दाखवले जात होते आणि बातमीत मात्र हेक्सा ब्लेड चा उल्लेख वारंवार केला जात होता.


चित्रपट सुट्टीतील कलाकारांच्यासाठी आता मुंबई सुरक्षित राहिलेली नाही अशा चर्चा गुरुवारपासून सुरू झाल्या मात्र देशातील एकमेव मेगा सिटी असलेल्या मुंबईत सर्वच जण सुरक्षित आहेत असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला. मुंबई असुरक्षित आहे, महाराष्ट्रात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे हे नसलेले वास्तव पुढे आणले तर त्याचा परकीय गुंतवणुकीवरही परिणाम होऊ शकतो याचा विचार केला गेला पाहिजे.


सैफ अली खान याच्या घरात घुसून अज्ञात गुन्हेगाराने प्राणघातक हल्ला केल्यानंतर, तपास यंत्रणेने आपल्या हालचाली गतिमान केल्या, तथापि अशा गतिमान हालचाली फरार असलेल्या वाल्मीक कराड याच्यासह अन्य संशयित गुन्हेगारांना पकडण्यासाठी केल्या गेल्या नाहीत. वाल्मीक कराड हा तर पोलिसांना शरण आला. दोन्ही घटनांतील या फरकावर सर्वसामान्य जनतेत चर्चा सुरू झाली नाही तरच नवल!

हेही वाचा :

चॅम्पियन्स ट्रॉफी संघ निवड: मोहम्मद कैफच्या निवडीने बुमराह आणि पंत वगळले

नाराजी नाट्यानंतर भुजबळ-पवार आमनेसामने!

पोलिसानं कारण नसताना महिलेला चोपलं, रणथंबोर एक्सप्रेसमधील Video Viral