‘सैफ अली खानवरील हल्ला…’; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, भाजपाचे (political party) नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी या घटनेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. “ही इतकी मोठी घटना नाही, मलाही १४ वेळा गोळ्या लागल्या आहेत,” असे विधान त्यांनी केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

“ही घटना तुम्ही लोकांनी जितकी मोठी सांगितली आहे, तितकी मोठी नव्हती. मलाही १४ गोळ्या लागल्या आहेत, घटना घडत राहतात. तुम्हाला वाटलं असेल की काहीतरी घडलं असेल, तो माणूस तिथे कसा गेला असेल? कदाचित ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल.

प्रसिद्धी मिळवण्याचा त्याचा हेतू असेल. जर आपण सैफ अली खानला मारलं तर आपण प्रसिद्ध होऊ. पण ही काही मोठी घटना नाही. देवाने सैफ अली खानला वाचवलं आहे आणि आता तो बरा होत आहे,” असे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.

“आम्हाला राजकारण हे सेवेचे माध्यम बनवायचे आहे आणि प्रत्येक व्यक्तीने सेवेतूनच राजकारण(political party) करावे,” असेही ते म्हणाले. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. “दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत. ते इतरांच्या सुरक्षिततेची काळजी कशी घेऊ शकतील?” असा सवाल त्यांनी विचारला.

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शहजादला अटक करण्यात आली असून, त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हायप्रोफाइल प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र काम केले.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात त्याच्यावर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले होते. त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून त्याची प्रकृती बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हेही वाचा :

राज्याला “पालक” मिळाले मात्र काही मंत्री नाराज…!

आता ‘या’ नेतेमंडळींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बळ वाढणार; पक्षाला मिळाली नवसंजीवनी

TikTok बॅन होताच Instagram चं युजर्सना नवं गिफ्ट! लवकरच लाँच करणार हे App