बांग्ला हिंदूंवर कट्टरपंथीयांचे हल्ले भारतात उसळली संतापाची लाट!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बांगला देशात, लोकसंख्येने जेमतेम 9 टक्क्यावर आलेल्या हिंदूंना त्यांनी देश सोडून जावे अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी तेथील कट्टर पंथीयांनी हल्ले(Attacks) सुरू केले आहेत. आणि त्याला पाकिस्तानची फूस आहे. हे आता लपून राहिलेले नाही.

विशेष म्हणजे तेथील हंगामी सरकारने, आमच्या देशात हिंदू सुरक्षित आहेत असा फसवा दावा केला आहे. हंगामी सरकारचे प्रमुख डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेश विरुद्ध मुद्दाम अपप्रचार सुरू असल्याचे म्हटले आहे. रस्त्यावर उतरलेले कट्टर पंथीय हे डॉक्टर मोहम्मद युनूस यांचे काही ऐकायला तयार नाहीत. परिस्थिती त्यांच्या हातातून नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. विशेष म्हणजे या हंगामी सरकारमध्ये हिंदूंचे दोन प्रतिनिधी आहेत. पण त्यांना मीडियासमोर बोलू दिले जात नाही किंवा त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला आहे.

दोनच दिवसापूर्वी सोशल मीडियावर बांगलादेशातील हिंदूंच्या गोशाळेतील गायीना काही कट्टरपंथीय माथे फिरू अमानुष मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यामुळेच भारतात, महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात बांगलादेशातील हिंदूंच्यावर होत असलेल्या हल्ल्याबद्दल(Attacks) निषेधाचे मोर्चे काढले जात आहेत.

बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रकारची निवेदने आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत. एकूणच बांगलादेश विरुद्ध संतापाची लाट भारतभर उसळली असून आता भारत सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे असा एक संदेश या संतापातून दिला गेला आहे.

बांगलादेशाची निर्मिती ही केवळ भारतामुळे झालेली आहे. पाकिस्तानच्या जोखडातून बांगला देशाला मुक्त करण्यात आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळख करून देण्यात भारताने आपले प्रचंड योगदान दिलेले आहे. भारतीय जवानांनी बांगला मुक्तीसाठी स्वतःचे रक्त सांडले आहे. पण त्या बदल्यात स्वतंत्र झालेल्या बांगलादेश ने भारताच्या अंकित राहिले पाहिजे अशी अजिबात भूमिका केंद्र सरकारची आणि लोकांची ही नव्हती. सध्याचा जो प्रगत बांगलादेश आहे, तो केवळ भारतामुळे. भारताने तेथे मोठी गुंतवणूक केली आहे. मोठे प्रकल्प राबवले आहेत.

तेथील उद्योगांसाठी भारतातूनच मोठ्या प्रमाणावर कच्चामाल पुरवठा केला जातो. अशी वस्तुस्थिती असताना तेथील कट्टर पंथीयांनी भारताला शत्रूस्थानी विशेषता हिंदूंना शत्रूस्थानी पाहिले आहे. बांगलादेशाच्या विरुद्ध भारतामध्ये ज्या प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागले आहेत त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली पाहिजे किंवा त्यांनी ते घेतलीही असेल.

बांगलादेशातील हिंदूंच्याविरुद्ध सुरू असलेले हल्ले हा त्या देशातील अंतर्गत मामला आहे. अशी भूमिका भारताला घेता येणार नाही. तेथील सरकारला कडक इशारे देऊन चालणार नाही तर, भूपृष्ठ मार्गाने त्या देशात भारतातून केली जाणारी निर्यात बंद केली जाईल, तुमची पश्चिम बंगालच्या “तीन बिघा जमीन” या सीमेवरून मिळणारी रसद तोडण्यात येईल. असे खलिते परराष्ट्र मंत्रालयाकडून बांगलादेशच्या भारतातील राजदूताकडे पाठवले गेले पाहिजेत. सर्व प्रकारची नाकाबंदी केली गेली पाहिजे.

भारतामध्ये सुद्धा बांगलादेशचे नागरिक राहतात. त्यांच्याशी चुकीचा व्यवहार केला जात नाही इकडेही तेथील हंगामी सरकारचे लक्ष वेधले पाहिजे. अमेरिकेची “जागतिक पोलीस” अशी जगभर ओळख आहे. सध्या तेथे ट्रम्प यांचे सरकार आहे आणि ते नरेंद्र मोदी यांचे अगदी व्यक्तिगत पातळीवरील मित्र आहेत.

अमेरिकेची मदत घेऊन बांगलादेशावर दबाव टाकला जाऊ शकतो. या देशाविरुद्ध संयुक्त राष्ट्र संघातही तक्रार करता येते. बांगलादेशातील हिंदूंच्यावर सुरू असलेले अत्याचार थांबवण्यासाठी तेथे संयुक्त राष्ट्र संघाने शांती सेना पाठवावी अशी मागणी भारताने केली पाहिजे. एखाद्या देशात अल्पसंख्यांक समाजावर बहुसंख्यांक लोकांच्याकडून अन्याय आणि अत्याचार होत असतील, हल्ले(Attacks) होत असतील तर त्याची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली पाहिजे आणि तसे संकेत आहेत. बांगलादेशातील हंगामी सरकारला, तेथील हिंदूंच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याचे आदेश संयुक्त राष्ट्र संघाने दिले पाहिजेत.

नरेंद्र मोदी यांची जागतिक पातळीवर चांगली प्रतिमा आहे. ते स्वतः धाडसी निर्णय घेतात. आणि म्हणूनच त्यांनी बांगलादेशावर लष्करी कारवाई करावी अशी मागणी हिंदू संघटनांच्या कडून केली जाऊ लागली आहे. तशी थेट कारवाई होण्याची शक्यता फारच धुसर आहे. तथापि या राष्ट्राची नाकाबंदी करता येऊ शकते. अटल बिहारी बाजपेयी हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी बांगला देशासाठी”तीन बिघा जमीन”या नावाने प्रसिद्ध असलेली सीमा खुली केली आहे. याच सीमेवरून त्या देशाला विविध प्रकारचा मालपुरवठा होतो.

हेही वाचा :

५० लाखांची मदत तरुणांना; महाराष्ट्राची रोजगार योजना काय आहे?

आयपीएलचे दोन दमदार खेळाडू मैदानात भिडले Video Viral

शरद पवारांनी तलवारीने केक कापला, राष्ट्रवादीच्या नेत्याने निलेश लंकेंना तलवारीनेच भरवला; VIDEO