नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दर दिवसारणिक एक नवा रंग (crunch anime)दाखवत असतानाच राज्यात आता मोठे नेतेमंडळीही जनमानसात जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही यास अपवाद नाहीत. पण, भंडारा जिल्ह्यातील कारदा गावाजवळ परतीच्या वाटेवर असतानाच नाना पटोले यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आणि अनेकांच्या काळजात धस्स झालं. पटोले यांच्या कारला धडक देत चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकनं केला असून, ही गंभीर घटना असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलं. भाजपकडून पटोलेंचा घातपात करण्याचा डाव आरोप करणारं ट्विट लोंढे यांनी केलं. 

 

जिथं अपघात झाला तिथं सध्या रस्त्याचं बांधकाम सुरु असल्यामुळं तिथं वाहनांचा वेग अतिशय कमी असतो. त्यातही नाना पटोले यांची कार तिथं उभी होती आणि त्या कारला ट्रकनं मागून धडक दिली. बरं ही धडक एकाच कारला लागल्यामुळं कुठंतरी शंका उपस्थित होत आहे, असं माध्यमांशी संवाद साधताना या अपघाताची (crunch anime)चौकशी करण्यात यावी ही मागणी लोंढे यांनी केली. 

हा घातपात आहे की नाही, हे आमच्या लक्षात आणून द्या असा आग्रही सूर लोंढे यांनी आळवला. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पटोले यांची सुरक्षा सरकार बदलल्यानंतर काढण्यात आली, किंबहुना प्रत्येक काँग्रेस नेत्याची सुरक्षा कमी करण्यात आली त्यामुळं इथं शंकेला वाव मिळत असल्याचं म्हणत अतुल लोंढे यांनी पुन्हा एकदा अपघाताचा संदर्भ दिला.  सुदैवानं कारला एका बाजूनं धडक बसल्यामुळं मोठं संकट टळलं अन्यथा… अशा शब्दांत त्यांनी घटनेचं गांभीर्य एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना व्यक्त केलं. 

‘विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ(crunch anime) त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे.
मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत’, असं ट्विट लोंढे यांनी केलं असून आता ते या अपघाताच्या चौकशीची मागणी उचलून धरताना दिसत आहेत. 

सदर प्रकरणी आपण रितसर तक्रार दाखल करणार असल्याचंही लोंढे यांनी स्पष्ट केलं. आजपर्यंत कधीही न घडलेली घटना, विरोध पक्षनेत्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेली घट आणि त्यानंतर झालेला अपघात पाहता या घटनांची साखळी चिंताजनक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

भंडाऱ्याजवळ आपल्या वाहनाला एका ट्रकनं जाणीवपूर्वक धडक मारण्याचा प्रयत्न केला ज्यामुळं कारला एका बाजूनं ट्रकनं घासत पुढे नेलं. सुदैवानं आपल्याला काही इजा झाली नाही. जनतेच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळं मी सुरक्षित असल्याची, प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा :

13 एप्रिलपासून या 3 राशींना येणार अच्छे दिन होणार आर्थिक भरभराट

2000 कोटी रुपयांमध्ये बनवले जाणारे हे दोन साऊथ चित्रपट

फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार