आकर्षक लूक ,जबरदस्त सेफ्टी फीचर…; महिंद्राचा नवा मॉडेल लाँच

कार खरेदी करण्याचे सर्वांचेच स्वप्न(launch) असते. कार खरेदी करताना बजेट, कारची स्पेस, फिचर्स या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. भारतातील कुटुंब ही मोठी आहेत. त्यामुळे भारतात 7 सीटर कारची क्रेझ वाढत आहे. अशातच महिंद्रा कंपनीने आपली नवीन 7 सीटर एसयूव्ही लाँच केली आहे. कंपनीने आपल्या XUV700 चा AX5 व्हेरियंट लाँच केला आहे. जो AX3 आणि AX प्रकरांमध्ये येतो. या कारमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहे.

महिंद्रा Mahindra XUV700 AX5 Select Car ही आधुनिक फीचर्ससह लाँच(launch) केली आहे. या कारची किंमत १६.८९ लाख रुपये आहे.याआधी महिंद्राने या कारचे MX3 व्हेरियंट लाँच केले होते. जर तुम्ही नवीन कार घ्यायचा विचार करत असाल तर XUV 700 AX5 S हा चांगला पर्याय आहे.

कंपनीच्या कारचे AX3 कार ही ५ सीटर आहे. परंतु आता Mahindra XUV700 AX5 व्हेरियंट 7 सीटर पर्यंयासह येतो. या कारमध्ये नवीन फिचर्स दिले आहे. यात तुम्हाला पॅनोरॅमिक सनरुफ, पुश बटण स्टार्ट/ स्टॉप आणि मॅप लॅम्प या सुविधा मिळतात. याशिवाय कारला ड्युअल 10.25 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील अनेक फीचर्स दिले आहेत. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि पार्किंग सेन्सरचा समावेश आहे.

या नवीन कारमध्ये 2.0 लीटरचे टर्बो इंजिन देण्यात आले आहे. याचसोबत 2.2 लीटर टर्बो डिझेल इंजिनचा पर्याय आहे. या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6- स्पीड टॉर्क कनर्व्हटर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहेत. डिझेल इंजिनमध्ये ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्याय आहे.

हेही वाचा :

सांगलीच्या जागेवर जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, ‘अपक्ष उमेदवाराची शिफारस…’

धक्कादायक! टीएमसी- भाजप कार्यकर्ते भिडले; मारहाणीत महिला कार्यकर्त्याचा मृत्यू

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग…Video