रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना ऑटोरिक्षाने उडवले, भयानक व्हिडिओ व्हायरल

वांद्रे येथे १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता घडलेल्या एका धक्कादायक अपघातात भरधाव ऑटोरिक्षाने(Autorickshaw) रस्ता ओलांडणाऱ्या दोन जणांना चिरडले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जण गंभीर जखमी आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन लोक रस्ता ओलांडताना दिसत आहेत. अचानक एक भरधाव ऑटोरिक्षा(Autorickshaw) येते आणि त्यांना चिरडत पुढे जाते. या अचानक घडलेल्या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ माजली आणि घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुरावे गोळा केले आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, मुंबईच्या मुलुंडमध्येही हिट अँड रनची घटना घडली होती, जिथे एक ऑडी कारने दोन ऑटोरिक्षांना धडक दिली होती. या अपघातात ऑटोरिक्षांचे चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले होते. विजय दत्तात्री गोरे असे कार चालकाचे नाव असून त्याने आपले वाहन सोडून पळ काढला होता. ४३ वर्षीय गोरेला अपघातानंतर काही तासांनी अटक करण्यात आली होती.

या दोन्ही घटनांनी मुंबईतील रस्त्यांवरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगून वाहन चालवावी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज तिसरा दिवस

अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; ‘पंचगंगेने’ इशारा पातळी ओलांडली

‘महिन्यातून 2 ते 3 वेळा तरी मी बॉयफ्रेंडसोबत…’, Janhvi Kapoor चा धक्कादायक खुलासा