दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही, तर पूर्ण दिवस खराब जातो, (experience)असा अनुभव अनेकांना येतो. सकाळी काही नकारात्मक घडल्यास त्याचा परिणाम उर्वरित दिवसावर होतो. त्यामुळे, सकाळची सुरुवात नेहमी चांगल्या सवयींनी करणे महत्त्वाचे असते.

सकाळचा निरोगी दिनक्रम :
सकाळचा निरोगी दिनक्रम केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. मात्र, काहीजण दिवसाची सुरुवात अशा काही चुकीच्या सवयींनी (experience)करतात, ज्याचा परिणाम शरीर, मन आणि जीवनावर होतो.
टाळायच्या चुका :
उशिरा उठणे: पूर्वी लोक सूर्योदयापूर्वी उठत असत, पण आता रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे सामान्य झाले आहे. ही सवय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. सूर्यप्रकाशाप्रमाणे दिनक्रम ठेवा, म्हणजे सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकर झोपा.
सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहणे: आजकाल मोबाईल (experience) जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, पण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहणे डोळ्यांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे इतर कामांना उशीर होतो आणि घाईगडबड होते.
सकाळी नकारात्मक विचार करणे: काही लोकांना सकाळी उठल्यावर नकारात्मक विचार करण्याची किंवा बोलण्याची सवय असते. यामुळे तुमचा मूड दिवसभर खराब राहतो. त्यामुळे, सकाळी उठल्यावर देवाचे आभार माना आणि सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करा.
हेही वाचा :
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
आता 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार; पण जुन्या नोटा…
महिलांनी स्वत:चं नाव कसं लिहायचं? महाराष्ट्र शासन लवकरच आणणार नवा जीआर