लाईटच्या समस्येमुळे पुरस्कार सोहळ्यात व्यत्यय; आयुक्त मॅडमने दिले दुरुस्तीचे आश्वासन

इचलकरंजी, 09 मार्च 2025 – जागतिक महिला(Women) दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशन व वेध फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व 2025 पुरस्कार वितरण सोहळा श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी श्रीमती निवेदिता माने (हातकणंगले लोकसभेच्या माजी खासदार) उपस्थित होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. सौ. पल्लवी पाटील मॅडम (आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका) आणि प्रमुख मान्यवर डॉ. युवराज मोरे व डॉ. रजनीताई शिंदे उपस्थित होते. या वेळी राज्यभरातील कर्तबगार महिलांचा(Women) शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला असला तरी, वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सोहळ्याला अनेकदा व्यत्यय आला. प्रमुख मान्यवरांसमोरच अशी समस्या निर्माण झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ही परिस्थिती पाहून उपस्थितांमध्ये “आयुक्त स्वतः उपस्थित असताना जर अशी व्यवस्था असेल, तर इतर वेळी काय अवस्था असेल?” असा प्रश्न निर्माण झाला.

या समस्येची तात्काळ दखल घेत आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांनी लवकरात लवकर तांत्रिक बाबींची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनावर खरोखरच कार्यवाही होते की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.

हेही वाचा :

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कायमचा होईल गायब! आहारात ‘या’ मसाल्याच्या पदार्थाचे सेवन

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाचं ‘ग्रँड वेलकम’ का होणार नाही?

“धंगेकरांच्या पत्नीला अटक होईल अशी भीती…; खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप