भजनात तल्लीन होऊन नाचू लागला चिमुकला हत्ती, मारले असे ठुमके की… Video Viral

तुम्ही सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओज व्हायरल होताना पाहिले असतील. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात कधी हसवतात तर कधी भावुक करतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांसंबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात ज्यातील दृश्ये नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचे ठरतात. आताही इथे एका हत्तीचा सुंदर व्हिडिओ व्हायरल(Viral) झाला आहे. या व्हिडिओने आता अनेकांचे मन जिंकले असून लोक आता याला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

लहान हत्तीला भजनावर नाचताना तुम्ही कधी पाहिलंय का? नाही तर हा व्हायरल(Viral) व्हिडिओ तुमचे मन जिंकेल. गुरुवायूर मंदिराने तिरुचेंदूर मंदिराला एक लहान आणि गोंडस हत्ती दिला असल्याचे सांगितले जात आहे. हा छोटा हत्ती सामान्य हत्ती नसून हा एक अनोखा हत्ती आहे ज्याला गाण्यांच्या तालावर नाचण्याचा छंद आहे. नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्येही हा हत्ती भजनात गुंग होऊन आपले शरीर हलवत तालासुरात नाचताना दिसला. हे दृश्य पाहून सर्वच थक्क झाले. चिमुकल्या हत्तीचे हे नृत्य आता अनेकांची मने जिंकत आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, लोक मंदिराच्या आतून भजन गाऊ लागतात. त्यानंतर लहान हत्ती, आनंदाने, भजनाच्या तालावर एकरूप होऊन नाचू लागतो. कधी तो त्याचे छोटे पाय टॅप करतो तर कधी नाचतो आणि आपली सोंड आणि कान हलवून आनंद व्यक्त करतो. छोट्या हत्तीच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर अनेकांना मोहून टाकले आहे. हत्ती हा मुळातच एक विशाल शरीराचा पण शांत असा प्राणी आहे. हत्तीचे असे हे रूप आजवर कोणी पाहिले नाही ज्यामुळे छोट्या हत्तीला नाचताना पाहून अनेकांना आनंदाचा धक्का बसला.

चिमुकल्या हत्तीचे हे नृत्य @gargivach नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. गुरुवायूर मंदिराने तिरुचेंदूर मुरुगन मंदिराला हत्तीचे बाळ भेट म्हणून दिले. त्याला नाचायला फार आवडते’ असे यात लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओ आतापर्यंत 1 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत हत्तीच्या या अनोख्या नृत्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “तो नाचत नाहीये तर तो तणावात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप गोड, या बाळाला इतकं छान नाचायला कोणी शिकवलं”.

हेही वाचा :

लग्नासाठी नवरदेव सजला पण घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचा थरारक Video Viral

LIC ने पॉलिसीधारकांसाठी लाँच केला नवीन प्लॅटफॉर्म

गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी! ‘ही’ कंपनी देत आहे एका शेअर वर एक शेअर बोनस!