शिवसेना बंडापासून तेव्हाचे बंडखोर नेते आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(assembly) यांची पाठराखन करणारे सुरत-गुवाहाटी आणि गोवामार्गे मुंबईत दाखल झालेले आमदार बच्चूभाऊ कडूंची आता चांगलीच सटकली आहे. पुढच्या काही दिवसांत ते एकनाथ शिंदेंची साथ सोडून, शिंदे-फडणवीस सरकारवर प्रहार करणार आहेत.
म्हणजे विधान निवडणुकीमध्ये प्रहारचे 20 ते 25 उमेदवार(assembly) देण्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे बच्चूभाऊ आता पंचा मारणार असल्याने शिंदे-फडणवीस विधानसभेलाही घायाळ होण्याची शक्यता आहे. अमरावतीतील प्रहारच्या उमेदवाराच्या पराभवानंतर बच्चूभाऊ आता चांगलेच संतापले आहेत.
भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा याचं दिल्लीला जाण्याचं स्वप्न भंग करणारे प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीला आणखी एक धक्का देणारा निर्णय घेतला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत 20 ते 25 जागांवर प्रहार पक्षाकडून उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसंच अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच, पण राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार देणार असल्याची घोषणा कडू यांनी केली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी यावेळी रवी राणा यांच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचंही जाहीर केलं. त्यामुळे आता नवनीत राणा यांचा लोकसभेला पराभव केल्यानंतर कडू यांनी रवी राणा यांचा पराभव करण्याचा निर्धार केल्याचं दिसत आहे. बच्चूभाऊंचा हा निर्णय महायुतीची डोकेदुखी वाढवणार यात शंका नाही.
अमरावतीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला महायुतीचे घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडू यांनी सुरुवातीपासून विरोध केला होता. अमरावतीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार होती, मात्र, बच्चू कडू यांनीदेखील या मैदानात उडी घेतली. शिवाय आपण राणा यांचा पराभव करु असा त्यांनी इशारा होता. त्यानुसार बच्चू कडू यांनी जोरगदार फिल्डिंग लावत नवनीत राणांचा पराभव केल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं.
हेही वाचा :
कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या प्रकरण, 5 कैद्यांना अटक
हृदयद्रावक! कोल्हापुरत भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती- पत्नीचा करुण अंत
मलायका अरोरा हिचे अत्यंत मोठे विधान, म्हणाली, मी फक्त म्हातारीच नाही तर तरूण मुलासोबत…