जम्मू काश्मीर येथील पेहलगाम येथे दहशतवादी(terrorist) हल्ला झाला. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पर्यटकांच्या एका समूहावर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हे पोलिस गणवेश परिधान करून आले. आधी त्यांनी पर्यटकांची नावे विचारली, त्यांचे ओळख पत्र तपासली त्यांनतर ते मुस्लिम नसल्याचे समाजाताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.

पहलगाम दहशतवादी(terrorist) हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे. आधी महाराष्ट्रातील ४ पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही पर्यटक पुण्यातिल आहे. जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीय काश्मीरला फिरायला गेले होते.
पहलगाम मध्ये असतांना या पाच जणांवर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी जगदाळे आणि गणबोटे कुटुंबातील पुरुषांना धर्म विचारला आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशीरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या तिघांचा मृत्यू झाल्याचा समोर आले आहे. मुंबईच्या डोंबिवलीतील रहिवासी अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला. पनवेलमधील दिलीप देसले यांचाही या हल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हे या हल्ल्यात जखमी झालेत. या अमानुष दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आह. पुणे, डोंबिवली, पनवेल शहरातील कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
काश्मीच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मीरमध्ये फिरायला येतात. यावर्षीही अनेक पर्यटक वाढल्यानं सर्वसामान्य काश्मिरी नागरिक आनंदात होते. परंतु हा आनंदाचा क्षण कधी दुःखाच्या काळोख्या छायेत बदलला, हे कोणालाही कळलंच नाही.
पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण वातावरण भयग्रस्त आणि शोकमग्न केलं. जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून सर्च ऑपेरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत. या हल्यात विशेष म्हणजे धर्म आणि ओळख विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे.
हेही वाचा :
राज्यात चोरट्यांचा सुळसुळाट; हातकणंगलेत तोंडावर स्प्रे मारून दागिने चोरले
एसी बसमध्ये जोडपं शारीरिक संबंध ठेवत होते, तेवढ्याच…; पुढे काय झाले ते जाणून घ्या
पुतण्या काकांची भेट! मनोमिलन शक्य अन् अशक्यही; महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय?