साडी(saree)म्हटलं की भारतीय महिलांचा जीव की प्राण… लग्न..साखरपुडा, कार्यक्रम कोणताही असो.. भारतीय महिलांच्या कपड्यांमध्ये साडी हा सर्वात खास आणि महत्त्वाचा पोशाख मानला जातो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यात महिला साडी नेसतात. आजकाल परदेशातही साड्या खूप लोकप्रिय झाल्या आहेत. पण तुम्ही कधी ऐकलंय का? साडी नेसल्याने महिलेला कॅन्सर होतो, हो हे खरंय, कारण एका संशोधनाने पुष्टी केली आहे की, साडी पेटीकोटमुळे महिलांना कर्करोग होऊ शकतो. या अभ्यासात डॉक्टरांना पेटीकोट कॅन्सर महिलांना आढळून आले आहे. संशोधनाशी संबंधित तथ्य जाणून घ्या.
ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, साडी(saree) हा पारंपारिक पोशाख घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेटीकोटमुळे कर्करोगाशी संबंधित आहे. पेटीकोट बांधण्यासाठी एक स्ट्रिंग असते, ज्याच्या घट्टपणामुळे त्वचेवर गुठळ्या तयार होतात, ज्यामुळे कर्करोग होतो. अहवालात एका 70 वर्षीय महिलेचा उल्लेख आहे. जिने तिचा पेटीकोट तिच्या उजव्या बाजूच्या फासळी आणि नितंबाच्या हाडाच्या भोवती घट्ट बांधला होता, ज्यामुळे तेथे व्रण तयार होतात. यानंतर, तपासणी दरम्यान, 18 महिने तिची तब्येत बरी झाली नाही, त्यानंतर डॉक्टरांनी कॅन्सरच्या पेशी असल्याचे निदान केले. त्याचप्रमाणे, आणखी एका 60 वर्षीय महिलेच्या उजव्या बाजूला एक व्रण होता, जो वर्षानुवर्षे बरा झाला नाही, त्यानंतर तो त्वचेचा कर्करोग मानला जात होता.
तुम्ही कधी विचार केला आहे का? की एखाद्या महिलेला साडी नेसल्यामुळे कॅन्सर झाला? एका नवीन संशोधनानुसार महिलांना साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो. हे कसे घडू शकते? संशोधनात असे आढळून आले की, 60 वर्षीय महिलेच्या त्वचेचा रंग आणि नसांमध्ये सूज आल्याने हा कर्करोग नसांमध्ये पसरला होता. अशा प्रकारे झालेल्या अल्सरला मार्जोलिन म्हणतात, हा एक दुर्मिळ प्रकारचा अल्सर होता. डॉक्टरांच्या मते, घट्ट कपडे परिधान केल्याने त्वचेवर ताण येतो, ज्यामुळे त्याचे कर्करोगात रूपांतर होते. महिलांनाही सैल कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला.
मात्र, भारतीय महिलांना साडी नेसणे बंद करण्याचा सल्ला देणे चुकीचे ठरेल. तज्ज्ञांच्या मते, सैल कपडे घाला, साडी बांधताना थोडे लवचिक व्हा आणि पेटीकोटची तार जास्त घट्ट करणे टाळा, जेणेकरून कर्करोगाचा धोका कमी होईल. याशिवाय जीवनशैली बदला, खाण्याच्या सवयींची काळजी घ्या, पौष्टिक आहार घ्या, सक्रिय राहा आणि दिवसभर एकाच जागी बसू नका. HPV लस घेणे, कर्करोगाची वेळोवेळी तपासणी करणे देखील फायदेशीर आहे.
हेही वाचा :
मुख्यमंत्र्यांची दोन तास चौकशी; अडचणींत होणार वाढ?
दिवाळी फराळ तळल्यानंतर तेल उरलंय; ‘या’ पद्धतीने पुन्हा वापरा तळणीचे तेल
रिलायन्स जिओचा आयपीओ धमाका करणार,भारतातील सर्वात मोठा आयपीओ कधी येणार?