टक्कल पडतंय? फक्त 15 रुपयांत मिळवा दाट केस!

केसांचे आरोग्य हा फक्त सौंदर्याचा विषय नसून तो एक गंभीर आरोग्याचा मुद्दाही (hair loss treatment)आहे. बदललेली जीवनशैली, चुकीची आहारशैली, तणाव, प्रदूषण आणि हार्मोनल असंतुलन यामुळे अनेक लोकांना केस गळतीचा सामना करावा लागतो. केस गळणे काही काळानंतर टक्कल पडण्यासारख्या गंभीर समस्येचे रूप घेऊ शकते. बाजारातील केमिकलयुक्त उपाय काही प्रमाणात मदत करू शकतात, पण त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक उपाय सर्वात उत्तम मानले जातात. अशाच नैसर्गिक उपायांमध्ये एक प्रभावी घटक म्हणजे ‘अळीव बिया’ किंवा गार्डन क्रेस सीड्स.

अळीवाच्या बिया म्हणजेच गार्डन क्रेस सीड्स हा एक सुपरफूड मानला जातो, जो आपल्या केसांसाठी अमृतासमान आहे. या छोट्या बिया केसांच्या पोषणासाठी आणि त्यांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरतात. यामध्ये प्रथिने, लोह, ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स आणि बायोटिन यांसारखे पोषक घटक असतात, जे केसांच्या वाढीस मदत करतात आणि गळती कमी करतात. दररोज अळीवाच्या बिया खाल्ल्यास केस मजबूत, दाट आणि निरोगी राहतात. चला, या बीजांचे फायदे आणि केसांसाठी त्यांच्या प्रभावीतेविषयी सविस्तर माहिती घेऊया.

अळीवाचा बियांमध्ये असलेले लोह आणि प्रथिने हे केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना अधिक मजबूत करतात. केस गळण्याचे प्रमुख कारण म्हणजे केसांच्या मुळांना योग्य पोषण न मिळणे. या बियांमधील पोषक घटक केसांची गळती थांबवून त्यांची मुळे अधिक सशक्त करतात. नियमितपणे (hair loss treatment)अळीवाच्या बिया खाल्ल्यास केसांच्या गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते आणि नव्या केसांची वाढ होते.केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी बायोटिन, लोह, आणि प्रथिनांचा समतोल असणे आवश्यक आहे. अळीवाच्या बियांमध्ये हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. बायोटिन केसांच्या पेशींना बळकट करून त्यांची वाढ वेगाने होण्यास मदत करतो. याशिवाय या बियांमध्ये व्हिटॅमिन C देखील असते, जे डोक्याच्या त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांना आवश्यक पोषण पुरवते.

पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण वाढत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे हार्मोनल असंतुलन आणि पौष्टिक आहाराचा अभाव. अळीवाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स असतात, जे टक्कल पडण्याची शक्यता कमी करतात आणि केसांची मुळे अधिक लवचिक ठेवतात. नियमित सेवन केल्यास हे केस गळतीची प्रक्रिया थांबवण्यास मदत करतात.अळीवाच्या बिया खाल्ल्याने केस अधिक(hair loss treatment) मऊ, लवचिक आणि चमकदार होतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स केसांच्या बाह्य संरचनेला संरक्षण देतात आणि त्यांना नैसर्गिक चमक देतात. कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी अळीवाच्या बिया अत्यंत प्रभावी मानल्या जातात.

कोंडा हा अनेकदा डोक्याच्या त्वचेतील कोरडेपणामुळे आणि पोषणाच्या कमतरतेमुळे होतो. अळीवाचा बियांमध्ये असलेले नैसर्गिक पोषण तंतू डोक्याच्या त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि कोंड्याची समस्या कमी करतात. यामध्ये असलेल्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे डोक्याच्या त्वचेतील संसर्गही दूर होतो.

साहित्य –

  • 100 ग्रॅम अळीव बिया
  • 1 कप नारळ पाणी
  • 3 कप किसलेला ताजा नारळ
  • 1 कप गुळ
  • 1 चमचा चिरलेले बदाम
  • 1 टेस्पून चिरलेला काजू
  • 1/4 टीस्पून जायफळ

कृती –

  • एका भांड्यात अळीवाच्या बिया घ्या. त्यात नारळाचे पाणी घालून मिक्स करा.
  • नारळपाणी लाडूंना छान चव देते.
  • तुम्ही साधं पाणी देखील वापरू शकता.
  • झाकण ठेवून 2 तास विश्रांती द्या.
  • मध्यम आचेवर पॅन गरम करा.
  • ताजे किसलेले खोबरे, भिजवलेले अळीव, गुळ, बदाम आणि काजू घाला
  • नीट मिक्स करा आणि मिश्रण मध्यम आचेवर शिजवा
  • 15 मिनिटे शिजवल्यानंतर लाडूचे मिश्रण एकजीव होईल
  • गॅस बंद करा आणि त्यात जायफळ किसून घ्या. नीट ढवळून घ्या
  • तुम्ही जायफळऐवजी वेलची पावडर घालू शकता.
  • मिश्रण थोडं थंड झाल्यावर लाडू वळून घ्या.
  • मिश्रण कोमट असतानाच लाडू वळून घ्या तरच ते पटकन आकार घेतील
  • हे फ्रीझमध्ये हवाबंद कंटेनरमध्ये 15 दिवस चांगले टिकू शकतात.

अळीवाचा हा पौष्टिक लाडू रोज एक ग्लास दुधासोबत खा. जास्त प्रमाणात खाऊ नका. पण रोज न चुकता एक लाडू खाल्ल्याने केस, नखे वाढतात. केस दाट, लांब व चमकदार होतात. त्यांना नैसर्गिकरित्या मजबूतपणा येतो.आयुर्वेद सांगते की उपाशी पोटी अळीव खाल्ल्याने जास्त फायदे मिळतात. दूध आणि तूप घालून सुद्धा तुम्ही हे भिजवलेले अळीव खाऊ शकता. यामुळे तुम्हाला वेगळी चव मिळेल. याखेरीज तूप आणि हळद मिसळून सुद्धा अळीव अधिक फायदेशीर होतात. हळद थंडीत शरीराला ऊब देण्यास आणि सूज कमी करायला मदत करते.

अळीवाच्या बिया हा नैसर्गिकरित्या केसांची गळती थांबवण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. यामध्ये केसांना आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे पोषक घटक असतात. केस गळती कमी करून त्यांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी याचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. दररोज १ चमचा अळीवाच्या बिया दूध किंवा पाण्यात भिजवून खा किंवा गाजराच्या ज्यूससोबत घ्या. यामुळे तुमचे केस निरोगी, लांब आणि चमकदार राहतील.

हेही वाचा :

मोठी बातमी! अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी

राजकारणात पुन्हा भूकंप होणार, ठाकरे गट फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस होणार

दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजी येथे लॉ प्रवेश यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन