बॉल बॉयने फाफ डू प्लेसिसला उचलून फेकले बाहेर …Video Viral

आता अबुधाबी T10 लीग 2024 अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 30 नोव्हेंबर रोजी लीगमधील गट टप्प्यातील सामने खेळले गेले. यानंतर १ डिसेंबरपासून अर्थात आजपासून प्लेऑफचे सामने सुरू झाले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो या लीगमधील मॉरिसन सॅम्प आर्मी संघाकडून खेळत आहे. या लीगमधील एका सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिस गंभीर दुखापतीतून थोडक्यात बचावला आहे. घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान(video viral) व्हायरल झाला आहे.

अबू धाबी T10 लीग 2024 चा 21 वा सामना 26 नोव्हेंबर रोजी शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना मॉरिसन सॅम्प आर्मी विरुद्ध दिल्ली बुल्स असा रंगला. या (video viral)सामन्यादरम्यान, बॉलच्या मागे जोरात धावत फाफ डु प्लेसिस सीमारेषेजवळ आला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या बॉल बॉयशी त्याची जोरदार टक्कर झाली. ही धडक फार जोरदार होती. यामध्ये फाफ डु प्लेसिस अगदी थोडक्यात बचावला.

दिल्ली बुल्सचा फलंदाज टीम डेव्हिडने डावाच्या आठव्या षटकात इसुरु उडानाच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरमध्ये शॉट खेळला. त्यावेळी फॅफ चेंडू रोखण्यासाठी धावला, पण चौकार बसलाच. फाफ डू प्लेसिस चेंडू थांबवण्यासाठी सीमारेषेकडे धावला तेव्हा बॉल बॉयही सीमारेषेच्या दोरीबाहेर उभा होता. त्यावेळी फाफ डू प्लेसिसला आपल्या वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो बॉल बॉयवर आदळला. त्याचवेळी, बॉल बॉय देखील बॉल पकडण्यासाठी खाली वाकला होता आणि शेवटच्या क्षणी तो अचानक उभा राहिला. अशा स्थितीत फाफ डू प्लेसिस बॉल बॉयच्या खांद्याच्या मदतीने डिजिटल जाहिरात फलकाच्या मागे पडला. या घडलेल्या घटनेचा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक लोक या घटनेची तुलना डब्ल्यूडब्ल्यूईच्या मारामारीशी करत आहेत, जिथे हे सगळे बघायला मिळते.

फाफ डू प्लेसिस हा गेल्या काही हंगामात आयपीएलमधील आरसीबी संघाचा भाग होता आणि कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळत होता. मात्र मेगा लिलावानंतर तो आता दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा :

लग्नाहून घरी जाताना कारची तरुणीला जोरदार धडक; धडकी भरवणारी घटना Viral Video

ईव्हीएम जबाबदार नाही? आता वाढीव मतांवर संशय; काँग्रेसचा नेत्यांवर ठपका!

क्वीन परतली! ऐश्वर्या रायचा खास फोटो व्हायरल…