सर्वसामान्यांना दणका! टोमॅटोचे दर गगनाला भिडले

सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजी पाल्यांचे(prices) दर वाढताना दिसले. टोमॅटो, हिरवी मिरची आणि पालेभाज्या यांसारख्या भाज्याचे दर गगनाला भिडल्याचं दिसून आलं. बदलत्या हवामानाचा पीकांवर गंभीर परिणाम झालाय.

सध्या पाले भाज्यांचे दर काही प्रमाणात उतरले आहेत. मात्र, कांदा-टोमॅटोचे दर(prices) अजूनही वरचढच आहेत. मुंबई, दिल्ली तसेच कोलकाता यांसारख्या शहरात टोमॅटो 100 रुपये किलोच्या भावाने विकले जात आहेत. राज्यातही बऱ्याच भागात टोमॅटोचे दर कडाडले आहेत.

त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जेवणातून कांदा आणि टोमॅटो जणू गायबच झाला आहे. एप्रिल-जून मधील तापमानाचा फटका टोमॅटोच्या उत्पादनाला बसला असून, गेल्या वर्षीच्या मान्सूनमुळे टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या टोमॅटोचा सरासरी भाव 33 टक्क्यांनी वाढून 80 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

गेल्या आठवडाभरात चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचे दर किमान 20 रुपयांनी वाढले आहेत. लहान आकाराचे वाण आणि रंग नसलेले टोमॅटो थोडे स्वस्त आहेत. मात्र, जरा मोठे आणि लाल रंगाचे टोमॅटोचे दर प्रचंड वाढले आहेत.

मुसळधार पावसामुळे काढणी आणि पुरवठा मंदावला आहे. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत कोलार हा बहुतांश राज्यांचा एकमेव मोठा पुरवठादार आहे. ईशान्य भारतात देखील भाजी पाल्यांचे दर वाढल्याचं चित्र आहे.

हिरव्या पालेभाज्यांचे उत्पादन घटल्याने टोमॅटो, बटाटा आणि कांद्याकडे मागणी वाढली आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की, जूनमध्ये अन्नधान्यमहागाई वाढून 9.36 टक्क्यांवर पोहोचली. यामध्ये भाजीपाला 29.32 टक्के, कडधान्ये 16.07 टक्के आणि तृणधान्याच्या किंमतीत 8.75 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा :

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा!

खळबळजनक ! दारूच्या नशेत तरूणाने वडिलांनाच जिवंत जाळलं; अन् नंतर…

आज गुरु-मंगळ योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; ‘या’ 5 राशींवर राहणार देवी लक्ष्मीची कृपा