मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या (election)पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीतील जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
“महायुतीत असलो तरी आम्ही ६० जागांवर लढण्याची तयारी केली आहे, आणि अधिक जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,” असे पवारांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी होणाऱ्या चढाओढीबद्दल तसेच महायुतीसोबत आघाडी करताना धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड न करण्याबाबत रोखठोक मत मांडले.
विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील, विशेषतः लोकसभेतील यशाच्या अभावानंतर, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा:
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे ठाकरे गटाची पाठ फिरवली..
“सशस्त्र दलांनी कायम सज्ज राहावे”: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सतर्कतेचा इशारा
सेल्फी काढताना पाय घसरून तरुण आणि तरुणी इंद्रायणीत बुडाले; कुंडमळा येथील धक्कादायक घटना