इचलकरंजीचा पेच सोडवण्यात बावनकुळेंना यश; अखेर आवाडे – हाळवणकर यांचे मनोमिलन

इचलकरंजी: काल केंद्रीय निवडणूक(Political updates) आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहेत.

दरम्यान आवाडे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशानंतर (Political updates)इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांत नाराजी पसरली होती. पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते हाळवणकर यांच्या सोबत असल्याने आवाडे पिता-पुत्रांना पक्षात प्रवेश करूनही मागील पंधरा दिवसापासून शहर कार्यालयात जाता येत नव्हते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला. त्यामुळे या मतदारसंघात पेच निर्माण झाला होता.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील राजकीय पेच प्रसंग दूर करण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना गुरुवारी यश आले. हाळवणकर – आवाडे यांचे मनोमिलन करून कार्यकर्त्यांच्या मनातील दुरावा या दौऱ्यात काही अंशी दूर करण्यात आले. या मतदारसंघातील कमळ चिन्हावरील उमेदवारास हाळवणकर यांनी निवडून आणल्यानंतरच त्यांना विधानमंडळात सहभागी करून घेण्याची ग्वाही बावनकुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली. भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

आवाडे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशानंतर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांत नाराजी पसरली होती. पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते हाळवणकर यांच्या सोबत असल्याने आवाडे पिता-पुत्रांना पक्षात प्रवेश करूनही मागील पंधरा दिवसापासून शहर कार्यालयात जाता येत नव्हते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला.

या पार्श्वभूमीवर हाळवणकर समर्थकांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन हा पेचप्रसंग सोडवण्याची मागणी केली होती. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी इचलकरंजीत आले होते. कार्यकर्त्याच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने आवाडे पिता – पुत्रांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकसंघपणे काम करण्याची गरज आहे.

आवाडे पिता-पुत्रांना भाजपमध्ये घेतल्यानंतर हाळवणकरांवर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. जशी अवस्था आज हाळवणकरांवर आहे तशी स्थिती माझी झाली होती. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर मलाही खूप वेदना झाल्या मात्र पक्ष हा परिवारातील प्रमुखांसारखा असतो. जीवनात चढ उताराच्या घटना घडत असतात. कुणीच खचून जाऊ नये वेळ आल्यावर त्याची परतफेड पक्षाकडून केली जाते.

बावनकुळे म्हणाले, शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यभर फिरत आहेत, तर काँग्रेसमध्ये १२ जण खुर्चीसाठी इच्छुक आहेत तिसरीकडे उद्धव ठाकरे तर यांना दररोज मुख्यमंत्री पदाचीच स्वप्न पडत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या राज्यातील १५ योजना उद्धव ठाकरेंच्या कालावधीत बंद पाडण्यात आले त्यामुळे राज्याच्या विकासासाठी महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आणावे लागेल यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा:

सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला

वानखेडेंच्या राजकीय इनिंगला ब्रेक; शिवसेनेकडून निवडणूक लढवणार नाही

भारताला मोठा धक्का, ऋषभ पंतला दुखापतीमुळे मैदानंच सोडावं लागलं