विराटच्या टीकेनंतर ‘फॅमिली रुल्स’बद्दल आले मोठे अपडेट, BCCI ने टीम इंडियाला दिला धक्का!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंना(Team India) टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बोर्डाने खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या परदेशी दौऱ्यांवर राहण्याबाबत काही नियम केले होते. त्यानुसार पूर्ण वेळ कुटुंब खेळाडू सोबत एकत्र राहू शकणार न्हवते.

या नियमावर विराट कोहली याला फारसा आनंद झाला नाही. या नियमावर त्याने टीका केली होती आणि त्यानंतर बोर्डाने नियमात काही बदल केल्याचे अहवाल समोर आले. मात्र, नक्की काय झालं याबद्दल जाऊन घेऊयात…

बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की, खेळाडूंचे कुटुंब एका कालावधीनंतर परदेशी दौऱ्यांमध्ये संघासोबत(Team India) राहू शकणार नाहीत. मात्र, विराट कोहलीच्या टीकेनंतर बीसीसीआय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याचा विचार करत असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

आता सैकियाने यावर एक मोठे अपडेट दिले आहे. “सध्याचा नियम या टप्प्यावर कायम राहील कारण ते राष्ट्र आणि आमची संघटना, बीसीसीआय या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी क्रिकबझला सांगितले.

सैकिया म्हणाले, “बीसीसीआय ओळखते की काही नाराजी किंवा भिन्न मते असू शकतात, कारण लोकशाही सेटअपमध्ये लोकांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हे नियम सर्व संघ सदस्यांना – खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफ आणि सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी समान रीतीने लागू होते. आणि प्रत्येकाचे सर्वोत्तम हित लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाते. हे नियम एका रात्रीत बनवलेले नाही.”

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हा दौरा ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ चालल्यास खेळाडूंचे कुटुंबीय परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघासोबत दोन आठवड्यांपर्यंत प्रवास करू शकतात.”बीसीसीआयने परदेशी दौऱ्यांदरम्यान खेळाडूंसोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या मुक्कामाचा कालावधी वाढवला आहे, विशेष परिस्थितीत नियम शिथिल करण्याच्या तरतुदीसह, परंतु हे योग्य प्रक्रियेद्वारे केले जाईल.” असे सैकिया म्हणाले.

हेही वाचा :

ऐन उन्हाळ्यात पावसाचा देण्यात आला इशारा; राज्यात पुढील तीन दिवस…

यड्राव : शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संतापाची लाट

‘गल्लीत राहायचं असेल तर एक लाख दे!’ आधी धमकी मग घरावर दगडफेक, कारही फोडली