बीसीसीआय सचिव जय शाहची मोठी घोषणा : क्रिकेटमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कारांची सुरूवात

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय क्रिकेटमध्ये (cricket)एक मोठा निर्णय घेतला आहे. 26 ऑगस्ट रोजी त्यांनी घोषणा केली की, महिला आणि ज्युनिअर क्रिकेट स्पर्धांमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

या नव्या पुरस्कार पद्धतीमुळे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात येईल. ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार एका विशिष्ट सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला दिला जाईल, ज्यात सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात येईल. तसेच, ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार संपूर्ण मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला प्रदान करण्यात येईल, ज्यात सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असणार आहे.

जय शाह यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे: “देशांतर्गत महिला आणि ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत ‘मॅन ऑफ द सीरिज’ आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे या पुरुषांच्या स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला रक्कम दिली जाणार आहे.”

या निर्णयामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. जय शाह यांनी या निर्णयासाठी एपेक्स काउन्सिलचे आभार मानले आणि भारतीय क्रिकेटच्या उन्नतीसाठी पोषक वातावरण तयार करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

हेही वाचा:

बनवा चटपटीत,चटकदार आगळी-वेगळी अशी कुरडईची भाजी

खुल्या कारागृहांची माहिती चार आठवड्यांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारांना आदेश

राहुल गांधी ५ सप्टेंबरला सांगली दौऱ्यावर; पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण