सावधान! हे Gadget तुमच्याकडे असल्यास जावं लागेल तुरुंगात, काय आहे प्रकरण?

आपल्या भारतात अनेक टेक गॅझेटवर बंदी घालण्यात आली आहे. या गॅझेटचा तुम्ही वापर करत असल्यास किंवा तुमच्याकडे ही गॅझेट (gadget)आढळल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

नुकतीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका महिलेकडे (gadget)सॅटेलाइट फोन सापडला. ज्यामुळे या महिलेला अटक करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

जगातील अनेक देशांमध्ये सॅटेलाइट फोनच्या वापरावर कोणतीही बंदी नाही. परंतु भारतात सॅटेलाइट फोनचा वापर केल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. यापूर्वी देखील असे अनेक लोकांसोबत घडले आहे.

आता देखील एका महिलेला सॅटेलाइट फोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे नवीन प्रकरण स्कॉटलंडमधील महिला हायकरशी संबंधित आहे. सॅटेलाइट फोन बाळगल्याप्रकरणी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर या महिलेला अटक करण्यात आली आहे.

महिला हायकरने सांगितलं की, तिला दिल्लीहून ऋषिकेशला जायचं आहे. विमानतळावर सुरु असलेल्या सुरक्षा तपासणीदरम्यान तित्याच्याजवळ एक सॅटेलाइट डिव्हाईस आढळून आले. यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं. अनेक तासांच्या चौकशीनंतर तिला सोडण्यात आलं.

कोणत्याही प्रकारचे सॅटेलाइट कम्युनिकेटर भारतात आणू नका, असे आवाहन महिलेने केले आहे. सॅटेलाइट ट्रान्समीटर दुर्गम भागातही काम करू शकतो. नैसर्गिक आपत्तीच्या काळात याचा खूप उपयोग होतो. परंतु सॅटेलाइट फोनवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

यापूर्वीही हे प्रकरण उघडकीस आले
सॅटेलाईट गॅझेट बाळगल्याप्रकरणी एखाद्याला अटक होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या महिन्यात चेक रिपब्लिकच्या एका नागरिकाला गोव्यात अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे एक GPS डिवाइस आढळले होते, ज्याला सॅटेलाइट ट्रान्समीटर जोडलेला होता.

संबंधित व्यक्ती 9 डिसेंबर रोजी दुपारच्या फ्लाइटने गोव्याहून दोहाला जात होता. सामान तपासत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याच्याजवळ गार्मिन एज 540 नावाचे गॅझेट सापडले. हा GPS-सक्षम सायक्लोकॉम्प्युटर आहे, जो वेग, अंतर आणि इतर गोष्टी मोजतो.

त्यात सॅटेलाइट ट्रान्समीटरही जोडलेला होता. पण भारतीय कायद्यानुसार कोणताही सॅटेलाइट ट्रान्समीटर किंवा फोन परवान्याशिवाय ठेवण्यास मनाई आहे. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तिला ताब्यात घेतलं.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानला जातोभारतीय कायद्यानुसार, परवान्याशिवाय कोणताही सॅटेलाईट ट्रान्समीटर किंवा फोन ठेवण्यास मनाई आहे. परवाना नसताना असे डिव्हाईस आढळल्यास त्याला अटक केली जाऊ शकते.

भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा, 1933 अंतर्गत, भारतातील सामान्य लोक सॅटेलाईट फोन घेऊ शकत नाहीत किंवा वापरू शकत नाहीत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या ताब्यात घेण्यास बंदी आहे.

हेही वाचा :

IT कंपनीतील तरुणीची हत्या: आर्थिक वादामुळे कोयत्याने घातक हत्या!

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार, 28 दिवसांचा फर्लो मंजूर

खळबळजनक ! महिलेची हत्या करून मुलाने घेतला आईला चापट मारल्याचा बदला