कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे(Villages) लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून, त्यांची करण्यात आलेली हत्या आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू ही दोन्ही प्रकरणे सर्वसामान्य माणसाने अस्वस्थ व्हावे इतकी धक्कादायक आहेत.
बीडच्या घटनेत राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण जाणवते आणि परभणीच्या प्रकरणात खाकी वर्दीतील अमानुषतेचे दर्शन घडते. या दोन्ही प्रकरणात गाव(Villages) आणि कुटुंबीय यांचे आक्रंदन रोज नवे रूप घेऊन पुढे येत असताना या दोन्ही घटनांचे राजकीय भांडवल सुद्धा केले जात असल्याचे दुर्दैवी चित्र महाराष्ट्राच्या समोर आलेले आहे.
सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी हे परभणीच्या दौऱ्यावर येत आहेत. परभणी येथे एका मनोरुग्ण तरुणाने संविधानाचा अवमान केला. त्यानंतर तेथे दंगल उसळली. या दंगलीत सहभाग घेतल्याचा संशय आल्यावरून पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांना अटक केली. त्यानंतर त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
होली से कोठाडीत झालेला मृत्यू हा खुणच असल्याचे समजून त्याचा तपास केला पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचा स्पष्ट केले असल्याने त्याच अनुषंगाने या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. या एकूण पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा होणारा परभणी दौरा हा पूर्णपणे राजकीय असला तरी त्याला विरोध करण्याचे कारण नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही परभणीचा दौरा केला आहे आणि तो सुद्धा गैर आहे असे म्हणता येणार नाही. कारण सोमनाथ चा मृत्यू आणि परभणी ची दंगल या दोन्ही घटनांचे सध्या राजाकीयीकरण झाले आहे.
राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांना सुद्धा भेटण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोध केला आहे. त्यांच्याकडूनही राहुल गांधी यांच्या दौऱ्याला विरोध करून राजकारण केले जात असल्याचे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. परभणी येथील सर्वसामान्य जनतेने किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्यास विरोध केला असता तर ते एक वेळेस समजून घेता आले असते.
मसाजोग गावचे(Villages) तरुण सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुंडांनी जबरदस्तीने अपहरण केले आणि नंतर अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. देशमुख हे या गावचे तिसऱ्यांदा निवडून आलेले सरपंच होते. यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते. सलग तिसऱ्यांदा सरपंच झालेल्या संतोष देशमुख यांना राहण्यासाठी नीटनेटके घरही नव्हते. त्यांचे घर झोपडी सदृश्य आहे. यावरून त्यांची प्रामाणिकता सिद्ध होते. आणि म्हणूनच त्यांची हत्या झाल्यानंतर ग्रामस्थ शोक संतप्त झाले.
त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद थेट नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत उमटले. संतोष देशमुख आणि त्यांचे मारेकरी यांच्यात कोणत्याही प्रकारचे वैमनस्य नव्हते किंवा त्यांना मरेपर्यंत मारावे असे कोणतेही तात्कालीक कारण नव्हते. गावातील भांडणात मध्यस्थी केली या एकाच किरकोळ कारणावरून त्यांची झालेली हत्या ही मन अस्वस्थ करणारी ठरते.
कोणी वाल्मीक कराड नावाचे बडे प्रस्थ आहे आणि त्याच्या मागे बीडचे मंत्री धनंजय मुंडे हे आहेत. आणि हेच वाल्मीक कराड संतोष देशमुख यांच्या ते मागील मास्टर माईंड आहेत असा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केल्यानंतर हे प्रकरण राजकीय पातळीवर गाजू लागले. विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू असताना हे संशयित वाल्मीक कराड नागपूर परिसरातील एका फार्म हाऊस वर वास्तव्याला होते असा आरोप अधिवेशनात करण्यात आला होता. वाल्मीक कराड याला वाचवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्याकडून सुरू असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. वाल्मीक कराड हे माझे मित्र आहेत याची कबुली मुंडे यांनी दिली आहे. तथापि धनंजय मुंडे हे कराड याला वाचवण्यासाठी मंत्रिपदाचा वापर करीत आहेत असे सध्या तरी म्हणता येत नाही.
अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात कितीही मोठी व्यक्ती असली तरी तिला आम्ही सोडणार नाही. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत सरकार शांत बसणार नाही अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी मस्साजोग गावच्या(Villages) ग्रामस्थांनाही दिले आहे. देशमुख हत्तेमधील काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अद्यापही काही संशयित मोकाट आहेत.
एकूणच हे प्रकरण सध्या राज्यभर गाजते आहे, आणि विरोधकांनीही हा विषय लावून धरताना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणचे राजकीय भांडवल केले जात आहे. संतोष देशमुख यांचे गावातून लोकांच्या साक्षीने अपहरण करणे, त्यानंतर निर्जन स्थळी त्यांना मरेपर्यंत मारहाण करणे, मेल्यानंतरही मृतदेहाची विटंबना करणे, हे मारेकऱ्यांच्या मागे मोठी शक्ती असल्याशिवाय घडणे शक्य नाही. किंवा मारेकऱ्यांना पोलिसांचे भय राहिले नाही असाही त्याचा अर्थ होतो. जोपर्यंत वाल्मीक कराड पोलिसांच्या हाती लागत नाही तोपर्यंत हे प्रकरण तापत जाणार एवढे मात्र नक्की.
हेही वाचा :
पुष्पा-2 स्क्रिनिंगदरम्यान ड्रग्ज पेडलरला अटक
बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने जिंकला आशिया कप, मिळवला ऐतिहासिक विजय
ती आली, राडा घातला अन् थेट सलमानच्या कानाखाली मारली…