कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोग नावाचे छोटेसे गाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही गेल्या महिन्यापासून गाजते आहे. गावचे चारित्र्यसंपन्न आणि तरुण (political news)सरपंच संतोष देशमुख यांची अगदी किरकोळ कारणावरून अतिशय निर्दयीपणे हत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला.
हे प्रकरण ज्याच्या भोवती सातत्याने फिरत होते तो (political news)वाल्मीक कराड मंगळवारी अपेक्षेप्रमाणे राज्य गुन्हे अन्वेषण च्या तपास अधिकाऱ्यांना पुण्यातील पाषाण येथे शरण आला, त्यामुळे खंडणीसह सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा रीतसर तपास होईल. सर्वसामान्य जनतेने तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि उपस्थित केल्या मुद्द्यांविषयी समाधानकारक खुलासा किंवा त्याचे निराकरण होईल. पण या एकूण प्रकरणातून बीड शहर आणि जिल्ह्याची जी काळीकुट्ट बाजू उजेडात आली आहे, ही अतिशय भयानक आहे. आणि दुर्दैवाने तिला राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे.
राजनिती हिंदी चित्रपटात रक्तरंजित राजकारण दाखवले होते. रक्तांचल चित्रपटात राजकीय गुन्हेगारीचे भेदक चित्रण होते, गॅंग ऑफ वासेपुर मध्ये कोळशावर आधारित, आश्रम वेब सिरीज मध्ये ड्रग माफिया व राज्यकर्ते यांच्यातील संबंधावर भाष्य केले गेले होते. मिर्झापूर वेब सिरीज मध्ये वेपन्स माफिया आणि राजकारणी यांच्यातील साठे लोटे दाखवले होते. धारावी बँक या वेब सिरीज मध्येही राजकारणाचा भेसूर चेहरा दाखवला होता. पण या सर्व चित्रपट वेब सिरीज मध्ये दाखवलेला हिंसाचार हा अंगावर येणार होता पण असं प्रत्यक्षात घडत असेल काय असा प्रेक्षकांना प्रश्न पडत होता.
आता संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे काय असा थेट सवाल सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारला विचारला आहे, पण बीड शहर आणि जिल्ह्यातील हिंसाचार, धन्य दांडग्यांचे, जात दांडग्यांचे अत्याचार पाहता उद्या बिहारचे लोक म्हणतील”बिहारचा महाराष्ट्र करायचा आहे काय?”
40 वर्षांपूर्वी गुन्हे प्रवृत्तीने महाराष्ट्राच्या (political news)राजकारणात चंचू प्रवेश केला होता. नंतर तो वाढत गेला. 21व्या शतकात राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ लागले आणि गेल्या दहा वर्षांपासून ते लक्षणीयरीत्या वाढलेले दिसेल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 40% हून अधिक उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते आणि ते निवडूनही आले आहेत. अवैध व्यवसाय, त्यातून पैसा, पैशातून दहशत आणि दहशतीमधून सत्ता असे एक दुष्टचक्र महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळते. त्यामध्ये बीड शहर आणि जिल्ह्यातील गुन्ह्यांवर आधारित असलेले राजकारण सर्वसामान्य जनतेचा थरकाप उडवते. एका वाचमनला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, तो प्रकार पाहता कोणाही शांतता प्रिय माणसाच्या मनाचा थरकाप उडावा.
बीडचे मंत्री धनंजय मुंडे यांची सावली बनून बीड शहर आणि जिल्ह्यात वावरणारा वाल्मीक कराड याचा संपूर्ण जिल्हा प्रशासनावर विलक्षण प्रभाव होता आणि तो त्याने मुंडे यांच्या अगदी निकटच्या वर्तुळात जाऊन प्राप्त केला होता. वाल्मीक कराड हाच या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे असे समजून सर्वांनी त्याच्याशी व्यवहार करावा अशा अप्रत्यक्ष सूचनाच मुंडे यांनी सर्वांना दिल्या होत्या
वाल्मीक कराड हा “ॲश माफिया”म्हणून संपूर्ण जिल्ह्यात कुप्रसिद्ध होता. परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेतून त्यांनी आपले काळे साम्राज्य उभा केले होते. या राखेला भरपूर मागणी असते आणि दहा ब्रास राखी ची किंमत 18 ते 20 हजार रुपये इतकी असते. वास्तविक ही राख केंद्राने टेंडर प्रक्रिया राबवून विकणे अपेक्षित होते. तथापि वाल्मीक कराड यांच्या दहशतीमुळे अशा प्रकारची प्रक्रिया तेथील अधिकाऱ्यांनी केव्हाही राबवली नाही. ही राख अगदी नाममात्र किमतीने वाल्मीक कराड विकत घ्यायचा.
एखाद्या अधिकाऱ्याने त्याला प्रतिबंध केला तर त्याच्या कपाळावर पिस्तूल रोखले जायचे. ही राख उचलण्यासाठी अनेक जेसीबी दिवसभर चालू असतात. शंभर पेक्षाही अधिक डंपर ही राख भरून बाहेर जात असतात. असे म्हणतात की या परिसरात किमान 1000 पेक्षा अधिक टिप्पर आणि डंपर आहेत त्यापैकी बहुतांशी वाहनांना रजिस्ट्रेशन नाही किंवा त्यांच्या क्रमांक पट्ट्याही नाहीत. दरवर्षी किमान 15 ते 20 हजार कोटी रुपयांची राख या केंद्रातून उचलली जाते. औष्णिक विद्युत केंद्रातील राख हा काही चर्चेचा विषय नसतो त्यामुळे अशा राखेतून महा गुंडाचे काळे साम्राज्य उभे राहिले आहे हे उर्वरित महाराष्ट्राला माहीतही नव्हते किंवा माहित व्हावे असे कारणही नव्हते. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मीक कराड याची दहशत महाराष्ट्राच्या समोर आली आणि त्यातून ॲश माफिया हे प्रकरण सर्वसामान्य जनतेला समजले.
दहशत, तिचा वापर करून राखेवर कब्जा, त्यातून पैसा, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा दहशत असे दुष्टचक्र बीडच्या परळी मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि ते देशमुख हत्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले.
वाल्मीक कराड याचे काळे साम्राज्य हे काही एका रात्रीत निर्माण झालेले नाही. परळीत तो साधा नगरसेवक होता, नंतर तो नगराध्यक्ष झाला आणि त्याने राजकीय उपद्रव मूल्य प्रस्थापित करून मुंडे कुटुंबीयांचे लक्ष वेधून घेतले.
सुरुवातीला गोपीनाथ मुंडे आणि आता धनंजय मुंडे यांचा उजवा हात बनवून कराड याने बघता बघता राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असलेली एक दहशत निर्माण केली. बड्या बड्या नेत्यांचे राजकीय आशीर्वाद असलेल्या वाल्मीक कराड याच्याकडे जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले. किंबहुना त्याला प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव केला नाही. पोलीस प्रशासनाचा तर त्याच्यावर वरदहस्तच होता. मंत्र्याची सावली बनून वावरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे धाडस स्थानिक पोलीस प्रशासनाला होणे केवळ अशक्य होते.
काही महिन्यापूर्वी बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईने शेतमालकीच्या हक्कावरून ग्रामीण भागात रिवाल्वर बाहेर काढून हवेत फायरिंग केले होते, आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून अटकही केली होती. परळी परिसरात( (political news)) वाल्मीक कराड याचे सहकारी अगदी खुलेआम हवेत फायरिंग करत आहेत असा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनीही रिवाल्वर हातात घेऊन हवेत फायरिंग केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पूजा खेडकर च्या आईवर ज्या तातडीने कारवाई करण्यात आली त्याच तातडीने बीडच्या गावगुंडांवर स्थानिक पोलिसांच्या कडून कारवाई का झाली नाही? त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे काय?
मंत्र्यांनी हवेत गोळीबार केला तर तो कायदेशीर ठरतो काय? आता उशिरा त्याची दखल घेऊन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गरज नसलेल्या लोकांचे शस्त्र प्रमाणे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. वाल्मीक कराड याच्यामुळे धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी वाल्मीक कराड यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध कबूल केले आहेत.
वाल्मीक कराड याच्या अवैध साम्राज्याला धनंजय मुंडे यांचेच आशीर्वाद आहेत हे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. काहीजणांनी वाल्मीक कराड याच्याशी मुंडे यांचे थेट नाव जोडले आहे. म्हणूनच सत्तेत असलेल्या अजितदादा पवार गटामध्ये अस्वस्थता आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रीपदातून मुक्त केले जावे अशी मागणीच काही आमदारांनी अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा :
देवा’मध्ये शाहिद कपूरचा धक्कादायक लुक: बिग बींची आठवण करून देणारा
उध्दव ठाकरेंना महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का!
BSNL ने युजर्सना दिलं New Year Gift! लाँच केले दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन