विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार-शिंदे गटात जुंपली

राज्यात काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येवून ठेपल्या आहेत. त्याअगोदर(assembly) मात्र आता महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांचा नाशिक दोरा झाला. परंतु आता या दौऱ्यानंतर महायुतीत तणाव वाढल्याचं दिसत आहे.

नाशिक दौऱ्यावर असताना सुनील तटकरेंनी नरहरी झिरवळ यांच्या उमेदवारीची(assembly) घोषणा केली. त्यानंतर मात्र महायुतीमध्ये अजित पवार आणि शिंदे गटात जुंपली असल्याचं चित्र निर्माण झालंय. झिरवळ यांच्या उमेदवारीमुळे दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले नाराज झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले यांनी ‘ तटकरेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार काय?’ असा सवाल विचारला आहे. त्यामुळे वातावरण आणखीनच तापलंय. उमेदवारीचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असं देखील धनराज महाले म्हणाले आहेत, मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती महालेंनी दिलीय.

शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी दावा केलाय की, प्रवेश केला तेव्हाच मुख्यमंत्र्यांकडून शब्द मिळालेला आहे. झिरवळ कुटुंबियांकडून लोकसभेत विरोधात काम झाल्याचा गंभीर आरोप धनराज महाले यांनी केलाय. महाले यांच्या दाव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरवर पुन्हा पुराचे सावट: चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मराठा व ओबीसी आरक्षण: “तुमचा पक्ष गुंडाळा” आंबेडकरांचे पवार-ठाकरे यांना खडे बोल

दररोज ३० मिनिटे सायकल चालविल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या..