विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाची राज्य शासनावर नाराजी

महाराष्ट्र विधानसभा (Assembly) निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात कोणताही निर्णय न घेतल्यामुळे आयोगाने राज्य शासनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

विधानसभा (Assembly) निवडणुकीच्या तोंडावर असताना, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत दिलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आयोगाने महाराष्ट्रासह चार अन्य राज्यांच्या मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात, एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सूचना दिली होती. तथापि, या पत्राकडे दुर्लक्ष झाल्याने आयोगाची नाराजी वाढली आहे.

आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, या बदल्यांची माहिती देण्यात आलेल्या कालावधीत का दिली गेली नाही, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.

राज्य शासन विधानसभा निवडणुकीसंदर्भात गंभीर नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

सलमानसोबत लग्न करायचंय…; फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली

निवडणुकीपूर्वीच ईडीकडून काँग्रेस नेत्याची संपत्ती जप्त

कोल्हापुरातील दौऱ्यात अमित शाह महालक्ष्मीचे दर्शन नाही घेणार : मंत्री हसन मुश्रीफ