लाडकी बहीण योजना ठरली मैलाचा दगड! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

पुणे : राज्य सरकारकडून मागील दोन दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजना (scheme)जाहीर करण्यात आली. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर करण्यात आल्या नंतर त्यांची लोकप्रियता अत्यंत वाढली. कोट्यवधी रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. योजना जाहीर झाल्यापासून ती चर्चेत राहिली असून विरोधकांनी यावरुन टीका देखील केली आहे.

हे मतदारांना प्रलोभन असल्याचे देखील विरोधकांकडून सांगण्यात आले. तसेच महायुतीच्याच नेत्यांमध्ये योजनेच्या (scheme) श्रेयावरुन रस्सीखेच देखील झाली. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सत्ताधारी पक्ष लाडकी बहीण योजनेचा पुरेपुर वापर करत आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केले आहे. या योजनेचा निर्णय मैलाचा दगड ठरला, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये आहेत. आळंदीमध्ये त्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावत वारकऱ्यांसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सर्वात आगळा-वेगळा आहे. वारकऱ्यांमध्ये येणे हे मी माझे भाग्य समजतो. त्याहून दुसरे पुण्य काहीच नाही.

खरं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असलो किंवा सरकारमध्ये असलो तरी राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचे स्थान नक्कीच मोठे आहे. राजकीय मंडळी ही आपल्यासमोर नतमस्तक होतात. कारण वारकरी एक अशी फॅकट्री आहे, जिथे समाज तयार केला जातो. म्हणूनच आनंद दिवे नेहमी वारकरी संप्रदाय समूहात मला घेऊन यायचे,” अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.

पुढे ते म्हणाले, “आपण महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलतीचे तिकीट दिले. त्यामुळे बहिणी भावजींना म्हणतात, आता तुम्ही घरीच बसा, मी बाजार करून येते. हा निर्णय घेताना एसटी तोट्यात येईल, असे विरोधक बोलत होते. पण आज या निर्णयामुळे एसटी फायद्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही सहाशे निर्णय घेतले. मात्र अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निर्णय हा मैलाचा दगड ठरला आहे. त्याचा अनुभव आम्हाला सर्वांना आला,” असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा:

मोठी बातमी! गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचे खास गिफ्ट

 ‘मुख्यमंत्री योजनादूत’ 50 हजार तरुणांना देणार रोजगार

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन