लाडक्या बहि‍णींना मिळणार ३००० रुपये; समोर आली मोठी अपडेट

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेत (yojna)कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नहिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत लवकरच हप्त्याचे पैसे वाढवले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जातील, असं सांगण्यात येत आहे. तर आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेत(yojna) आता काही महिलांना ३००० रुपये दिले जाणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, आता महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्रित मिळू शकतात. त्यामुळे जानेवारी महिन्यात तुम्हाला ३००० रुपये मिळू शकतात. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत सहावा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटी येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, डिसेंबर महिना संपण्यासाठी अवघे १० दिवस उरले आहेत. अद्यापही मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले नाही. त्यामुळेच पैसे अजून आले नसल्याचे सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या महिन्याच्या अखेरीस पैसे येणार असे सांगितले आहे. या योजनेत आता लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. परंतु डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्र येणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी येणार याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. महिलांनो मार्यपर्यंत थांबा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २१०० रुपये दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली होती.

हेही वाचा :

राज्यमंत्रिपदाची ऑफर नाकारली, नाराज भुजबळ मुंबईत; कोणता निर्णय घेणार?

नवर्षापासून बस प्रवाशांच्या मोबाईलवर लोकेशन दिसणार

“25व्या वर्षी लग्न केले, पण…” तेजश्री प्रधानने लग्नावर व्यक्त केलं मत