बॉलिवूडच्या(Entertainment news) ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी 1970 चं दशक आपल्या अभिनयाने गाजवलं होतं. रेखा त्यावेळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. रेखा यांच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. पण रेखा त्यावेळी निर्मात्यांना फार नखेर दाखवत असत. नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रणजीत यांनी मुलाखतीत हा खुलासा केला आहे. तसंच आपण तिच्याकडे चित्रपट साईन करण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचंही सांगितलं.

रणजीत यांनी नुकतीच विकी लालवानी यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत रणजीत(Entertainment news) यांनी जुने किस्से सांगितले. तसंच रेखा यांच्यासोबतच्या बदलत्या समीकरणाबद्दल सांगितलं. “मी जवळपास एक दशकभर चित्रपट साईन केले नव्हते. मी यामुळे फार चिडचिड करायचो. जेव्हा मी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली, तेव्हा अभिनेत्यांसह असलेलं संबंध, नाती यांचा विचार न करता त्यांना त्यांच्या कामाचे पैसे देत असे. अनेकदा अभिनेते माझ्याकडून पैसे घेण्यासाठी कचरत असत, पण मी आग्रह करत असे,” असं रणजीत यांनी सांगितलं.
“अशाच प्रकारे रेखालाही सांगितलं होतं. तू माझी मैत्रीण आणि जे काही असलीस तरी मी तुला एका चित्रपटासाठी साईन करत आहे. तू एक रक्कम सांग, ती मी तुला देईन. नंतर माझ्या लक्षात आलं की तिला कोणीतरी दुसऱ्या एका चित्रपटासाठी साईन केलं होतं. ते तिला 5 लाख देत होते, जे तिने मला सांगितले होते त्यापेक्षा कमी होते,” अशी आठवण रणजीत यांनी सांगितली.
रेखा कित्येक तास निर्मात्यांना घराबाहेर वाट पाहत उभं राहायला लावत असे. अनेकदा तर ती त्यानंतरही त्यांची भेट घेत नसे असाही खुलासा रणजीत यांनी केला आहे. “मला माहित होतं की ती निर्मात्यांना तिच्या घराबाहेर रांगेत उभे करायची आणि त्यांना भेटायची नाही. जेव्हा मी तिला चित्रपटाची कथा सांगत होतो, तेव्हा माझी संपूर्ण टीम बाहेर वाट पाहत होती, तिने त्यांना आत येऊ दिलं नाही. मी तिच्याशी याबद्दल बोललो, तर ती म्हणाली, ‘ त्या सर्वांना बाहेर वाट पाहू द्या’. फक्त फरजाना त्यांच्याकडून संदेश घेऊन जायची आणि ते तिला सांगायची. ती कोणालाही भेटायची नाही,” असं ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितलं.
“ती त्यावेळी एका चित्रपटात काम करत होती म्हणून तिने मला सांगितले की आपण दिवसाऐवजी रात्रीचे शूटिंग करू. मी तिला स्पष्ट सांगितलं की, मी हा चित्रपट तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी बनवत आहे. ती मला इतर निर्मात्यांप्रमाणे वागवेल याची मला जाणीव झाली होती. म्हणून, ती त्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी, तिला नम्रपणे साइनिंग अमाऊंट परत करण्यास सांगितलं. मी म्हणालो, ‘रेखा, कृपया मला माझे पैसे परत कर, मी तुझ्यासोबत हा चित्रपट बनवू शकत नाही.’ हे सर्व मैत्रीपूर्ण पद्धतीने घडले,” अशी आठवण रणजीत यांनी सांगितली.
याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं की, “यामागील कारण अमिताभ आणि तिच्यात बिनसलं होतं. पण नंतर चांगले मित्र झाले. यानंतर तिची मुंबईत थांबण्याची इच्छा होती. पण मला शेतात शूट करायचं होतं, जे मुंबईबाहेर होतं. तिला संध्याकाळी घऱी यायचं होतं आणि मला गाणी संध्याकाळीच शूट करायची होती. ती म्हणाली की, आपण दिवसा शूट करु, मला रात्री घरी यायचं आहे. तिला कोरिओग्राफरही पटत नव्हता. आम्ही तोदेखील बदलला. तिचे फार नखरे असायचे”.
हेही वाचा :
राज्यातील बसस्थानकांबाबत मोठा निर्णय…
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा दणका
भाजपचा उद्धव ठाकरेंना दे धक्का, ‘या’ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ