कोल्हापुरातील भोसले नाट्यगृहाला आग लावली की लागली? जरांगेंनी उपस्थित केली शंका

कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह काल लागलेल्या भीषण आगीत(fire) पूर्णतः जळून खाक झालं. नुकतेच कोल्हापूर महापालिकेने मोठा खर्च करून या नाट्यगृहाचे पुनरुज्जीवन केले होते, त्यामुळे या घटनेवर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील या घटनेवर प्रश्न उपस्थित करत, कोल्हापुरातील मराठा समाजाला सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

जरांगे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर कोल्हापुरात(fire) आयोजित सभेला संबोधित करताना, “भोसले नाट्यगृहाला आग लागली की लावली?” असा सवाल केला. त्यांनी कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत, अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या संकटाचीही चर्चा केली.

जरांगे म्हणाले, “कोल्हापूर सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान होतंय, आणि दुसरीकडे नाट्यगृहाला आग लागलीय. मला कोल्हापुरातील मराठ्यांना सांगायचं आहे की, कुठल्याही प्रकारच्या राजकारणात सहभागी होऊ नका, जातीच्या राजकारणाला दूर ठेवा.”

जरांगेंनी आरक्षणाच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणाच्या समस्येवर लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले, आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर हा नवीन विषय मांडला.

हेही वाचा :

वारं फिरलं, वातावरण हेरलं! बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? 

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर जामीन मंजूर

शिवस्वराज यात्रा उद्घाटनादरम्यान जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले; VIDEO