कोल्हापूरमध्ये भाजपचा मोठा नेता शरद पवार यांच्या गळाला?

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता फोडाफोडीचं राजकारण(political news) सुरू झालं आहे. महायुती आणि मविआमध्ये जागावाटपावरून वाद होण्याची दाट शक्यता आहे. मात्र जागावाटपाच्या आधी शरद पवार भाजपचे बडे मोहरे टिपताना दिसत आहे.

कोल्हापूरमध्ये कागलमध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जवळचा मानला जाणारा एक बडा नेता आता हातात तुतारी घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कागलमध्ये समरजीत घाटगे यांना हाताशी धरत भाजपला धक्का दिला. आता भाजपचा(political news) आणखी एक नेता पवारांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.

भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्याशी शरद पवार यांच्या पक्षाकडून संपर्क झाल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये कागलची पुनरावृत्ती चंदगडमध्ये होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामुळे शिवाजीराव पाटील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

चंदगडमध्ये राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे शिवाजीराव पाटील यांनी तुतारी हाती घेतली तर तिथे शरद पवार गट वि. अजित पवार गट अशी रंगतदार लढत होऊ शकते. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढला असून लोकांचाही त्यांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग वाढण्याची दाट शक्यता आहे.

शरद पवार यांनी कागलमध्ये मोठा डाव खेळला. समरजीत घाटगे यांचा पक्षप्रवेश करत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी देणार आहेत. कागलमध्ये अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आमदार आहेत. त्यामुळे आता कागलमध्ये शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे आणि अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांच्यात लढत होणार आहे. 3 सप्टेंबरला समरजीत घाटगे यांचा पक्षप्रवेश पार पडला होता.

दरम्यान, शिवाजीराव पाटील यांची समजूत काढून ते जात असतील तर त्यांना थांबवण्यासाठी भाजप प्रयत्न करेल. तर कोल्हापूरमध्ये भाजपला लागलेली गळती थांबवण्याचं आव्हान भाजप नेतृत्वाकडे असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डॅमेज कंट्रोल करण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा:

दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडने हार्दिकच्या Ex-पत्नीसोबत पूलमध्ये केलं असं कृत्य… Video

खळबळजनक ! महाविद्यालयाच्या आवारातच विद्यार्थ्याचा खून; कोयत्याने केले सपासप वार

अखेर सचिन तेंडुलकरचा ‘तो’ विक्रम मोडलाच, विराट कोहलीने रचला इतिहास…