भाजपला मोठा धक्का, समरजितसिंह घाटगे ‘तुतारी’ फुंकणार; आज होणार जाहीर पक्षप्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच (new political party)तापलं आहे. अशात पश्चिम महाराष्ट्रातून भाजपला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. विधानसभेपूर्वीच भाजपच्या एका बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, भाजपचे नेते समरजित घाटगे आज 3 सप्टेंबररोजी शरद पवार गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजता हा पक्षप्रवेशाचा (new political party)कार्यक्रम होणार आहे. शरद पवार सध्या चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत समरजित सिंह घाटगे पक्षप्रवेश करणार आहेत. कागलमध्ये समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाआधी जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.

कागलमध्ये ‘ वस्ताद येत आहेत…’, असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या या बॅनरचीही जोरदार चर्चा आहे. कागलमधील गैबी चौक या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जाहीरसभा होणार आहे. या सभेत समरजित घाटगेंचा पक्ष प्रवेश होणार आहे.

कागल येथील गैबी चौकात मंत्री हसन मुश्रीफ यांचं घर असून मुश्रीफांच्या अनेक सभा या गैबी चौकातील मैदानावरच होत असतात. आता याच ठिकाणी शरद पवारांनी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम ठेवल्याने याचीही चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीमध्ये समरजित घाटगे यांनीही म्हटलं होतं की, “या जागेवर शरद पवार आधीपासून सभा घेत आहेत. ती शरद पवारांची सभा घेण्याची जागा आहे.”

दरम्यान, समरजित घाटगे यांनी पक्षाची साथ सोडल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. 2016 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2019 मध्ये समरजित घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तेव्हा हसन मुश्रीफ यांच्याकडून घाटगेंचा पराभव झाला.

आता समरजित घाटगे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण,काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कागलमध्ये आलेले असताना त्यांनी मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केली. अजित पवार गट हा महायुतीमध्ये असल्याने ही जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे समरजित घाटगेंनी मोठा निर्णय घेत थेट भाजपला धक्का दिला. आज ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.

हेही वाचा:

अंबाबाईच दर्शन घेणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती

धक्कादायक! काँग्रेस नेत्याने कुटुंबासह आयुष्य संपवलं

इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला वीज सवलत, आमदार प्रकाश आवाडे यांचा महत्वाकांक्षी विजय