पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे (todays political news)माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

गेल्या काही दिवसांपासून धंगेकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या WhatsApp स्टेटसवर भगवं उपरणं दिसल्यानंतर चर्चांना अधिक उधाण आलं. त्यांनी स्पष्ट केलं की, “सत्तेशिवाय लोकांची कामं करता येत नाहीत, त्यामुळे पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला.”
ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी आमदार असतानाही मला मदत केली होती. ते आणि उदय सामंत वारंवार संपर्कात होते. त्यामुळे लोकांच्या विकासासाठी मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.”
धंगेकर यांनी आज मुख्यमंत्री(todays political news) एकनाथ शिंदे यांची संध्याकाळी 7 वाजता भेट घेणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत तारीख निश्चित केली जाणार आहे.
धंगेकर हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. मात्र आता 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर धंगेकरांना आगामी महापालिका निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. पुण्यात भाजप-शिवसेना युतीला मजबूत करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाईल, अशी शक्यता आहे.
हेही वाचा :
अभिमानास्पद! चंद्रयान 2 ने उलगडलं चंद्राचं मोठं रहस्य, अद्भूत शोध; इस्त्रोही आनंदी…
टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर चमकेल, सोमवारी शेअर बाजारात दिसून येईल जोरदार हालचाल
‘तुम्ही केसरच्या नावाखाली….’, पान मसाला जाहिरातीवरुन शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला अखेर नोटीस