पुणे : लाडकी बहीण योजनेच्या लाटेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीला मोठं बहुमत मिळालं. काँग्रेसच्या(Congress) अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला.

त्यानंतर काँग्रेसने(Congress) या पराभवाची गंभीर दखल घेतली असून नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपादवरून उचलबांगडी केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभारही स्वीकारला अशातचं आता काँग्रेसचा एक बडा नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ते काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा प्रवेशासंदर्भात थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत बैठक झाल्याचेही म्हटले जात आहे.
हेही वाचा :
आईच्या कुशीत निजलेल्या चिमुकलीला बिबट्याने उचललं…
वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
कंगणा 20 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत होती रिलेशनमध्ये; स्वत: केला मोठा खुलासा