IPL 2025 आधी SRH ला मोठा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर

आयपीएल(IPL) 2025 सुरू होण्याच्या अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डरला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

ब्रायडन कार्सला २०२५ च्या आयपीएल लिलावात SRH ने १ कोटी रुपयांना विकत घेतले होते, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याला IPL मधून माघार घ्यावी लागली. कार्सच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डरला SRH ने ७५ लाख रुपयांना करारबद्ध केले आहे.

वियान मुल्डरचा टी२० परफॉर्मन्स पाहता, तो कार्सपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतो. त्याने आपल्या टी२० कारकिर्दीत २,१७२ धावा आणि १२ अर्धशतकं केली आहेत. तसेच ६७ विकेट्स घेतल्या आहेत, त्यामुळे तो SRH साठी महत्त्वाचा ठरू शकतो.

मुल्डरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी ३ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आणि चांगली अष्टपैलू कामगिरी दाखवली. IPL 2025 लिलावात तो अनसोल्ड राहिला होता, पण आता त्याला SRH कडून पदार्पणाची संधी मिळणार आहे.

SRH संघ २३ मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. कार्सच्या जागी मुल्डर SRH साठी महत्त्वाचा ठरणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

हेही वाचा :

वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट

शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील

महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष