ठाकरे गटाला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात पक्षप्रवेश

कल्याण :- विधानसभा निवडणुकीसाठी(political news) सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचपार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकारण चांगलंचं ढवळून निघत आहे. डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवासेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी आपले बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे आणि आणखी सहा माजी नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

या प्रवेशानंतर राजकीय(political news) वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.मात्र यानंतर आता शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. कल्याण पूर्वेत आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे शिवसेना पदाधिकारी चंद्रकांत बोराडे शिवसेना विधानसभा समनव्यक प्रशांत काळे, शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या उपस्थितीत ही प्रवेश प्रक्रिया पार पडली.

शिवसेना पदाधिकारी प्रशांत काळे यांनी या प्रवेशांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी अनंत आमरे उपविभाग प्रमुख माजी सैनिक संघटना कल्याण शहर महेंद्र एटमे , विभाग प्रमुख,प्रकाश यादव उपशाखाप्रमुख, विकास कदम उपशाखाप्रमुख, राहुल मोरे उपशाखाप्रमुख, महेश नाईक उपशाखाप्रमुख, तन्मय एटमे युवा सेना पदाधिकारी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. कल्याण पूर्व विधानसभेत ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्यचं समोर आलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात आणखी काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना पदाधिकारी प्रशांत काळे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन अनेक तरुण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती देखील काळे यांनी यावेळी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र मोठ्या संख्येने शिंदे गटात पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे आता ठाकरे गट काय भुमिका घेणार हे पाहणं औत्स्तुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा:

डिझेल वाहने बंद होणार? डेडलाईन जाहीर

दोन अग्नीवीरांचा मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून अंगावर येईल काटा

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद