महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत ‘आप’चा मोठा निर्णय

मुंबई : राज्यामध्ये पुढील महिन्यामध्ये विधानसभा(Assembly) निवडणूका होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये 20 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता लागली असून सर्व पक्षांची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. यामध्ये प्रमुख लढत महायुती व महाविकास आघाडीमध्ये होणार आहे.

दोन्ही युती या पहिल्यांदाच विधानसभा(Assembly) निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तसेच बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या निवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने विधानसभेबाबत निर्णय जाहीर केला आहे.

यंदाच्या विधानसभेसाठी महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना दिसत आहे. शरद पवार हे जोरदार राजकारण करत असून त्यांच्यामध्ये अनेक नेत्यांचे पक्षांप्रवेश देखील होत आहे. इंडिया आघाडी म्हणून महाविकास आघाडी आणि आम आदमी पार्टी हे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले होते.

मात्र नुकत्याच पार पडलेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीमध्ये हरयाणामध्ये कॉंग्रेस व आप एकमेकांविरोधात उभे राहिले. याचा फटका कॉंग्रेसला देखील बसला. हरयाणामध्ये भाजपने विजयश्री खेचून आणून ऐतिहासिक असा विजय मिळवला. यानंतर आता महाराष्ट्रमध्ये अशा पद्धतीचा फटका बसू नये म्हणून महाविकास आघाडीकडून पूर्ण तयारी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आप आणि कॉंग्रेस हे पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसणार नाहीत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाने न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवल्याने भाजपला फायदा झाला होता. यामुळे आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक लढवणार नाहीत. असा आपने मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र. हा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या दबावामुळेच आपने घेतल्याचंही बोलले जात आहे. मात्र सध्या तरी आप हे महाराष्ट्राच्या निवडणूकांच्या रिंगणामध्ये नसणार हे समोर आले आहे. याचा महाविकास आघाडीला फायदा होताना दिसणार आहे. आपचे प्रबळ हे दिल्लीमध्ये असून त्यांचे महाराष्ट्रमध्ये पक्ष संघटन म्हणावे तितकेचे प्रभावी नाही. तसेच आपची मतं विभाजन होणार नसल्यामुळे भाजपला फटका बसणार आहे.

हेही वाचा:

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता!

ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाढीने गृहिणींचे कोलमडले बजेट

इचलकरंजी भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे बेदखल; हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजी कायम