राज्य सरकारने कांदा उत्पादक (Manufacturer) शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याची नासाडी रोखण्यासाठी आणि साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक, छत्रपती संभाजी नगर, आणि सोलापूर येथे तातडीने कांदा बँक सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कांदा (Manufacturer) हे नाशवंत पीक असल्याने अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येणार आहे. या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
कांद्याची महाबँक ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून त्याची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. येथे हिंदुस्थान अॅग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू होत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत सांगितले आहे. कांदा महाबँक ह्या कांद्याचे उत्पादन ज्या भागात जास्त प्रमाणात होते, अशा ठिकाणी उभारल्या जाणार आहेत.
कांद्याचे उत्पादन (Manufacturer) जास्त होणारे भाग नाशिक, छत्रपती संभाजीनगर, आणि सोलापूर येथे विकिरण प्रक्रिया केंद्र उभारून कांद्याची महाबँक तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा :
पॅरिस ऑलिम्पिक २०२४: भारताच्या ११७ खेळाडूंच्या चमूत हरयाणा आणि पंजाबचे सर्वाधिक खेळाडू
NEET-UG चा सुधारित अंतिम निकाल जाहीर: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुधारणा
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद