देशभरात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अशातच काही दिवसांपूर्वी या धोरणासंदर्भात केंद्र सरकारने(political news) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी वन नेशन-वन इलेक्शन म्हणजे एक देश-एक निवडणुकीला मोदी मंत्रिमंडळाची मान्यता दिली होती. मात्र अशातच आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी देखील स्वीकारल्या होत्या. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी(political news) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे यासंदर्भातील विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची शक्यता दाट आहे.
मात्र हे विधेयक लागू करण्याआधी यासंदर्भात संसदीय समितीची स्थापना करण्यात येईल. त्या समितीसमोर सर्व पक्ष आपली भूमिका मांडतील. आणि त्यानंतर संसदेत हे विधेयक समंत केले जाईल. तसेच लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचे बहुमत आहे. त्यामुळे एनडीएमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक संमत होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रपती त्यावर सही करतील. तसेच त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनी कांद्याच्या दरामुळे केंद्राकडे केली मोठी मागणी!
मोठा संवाद! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकी चर्चा कशावर?
मराठी उद्योजकतेचा जलवा: छोट्या सुरुवातीचे कोट्यवधींचे यश