गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या (bigdrop inc)प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. शुक्रवारी 13 डिसेंबर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती, तर आज शनिवारी 14 डिसेंबर देखील या घसरणीचा सिलसिला सुरूच आहे.शनिवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 73,000 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 500 रुपयांची घट झाल्याचे दिसून आले आहे. या घसरणीमुळे दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतर भागांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,000 रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. मुंबई, चेन्नई, आणि बिहारसारख्या भागांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 72,300 रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याच्या किमतींसोबतच( bigdrop inc)चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. काल चांदीचा प्रति किलो दर 96,500 रुपये होता, मात्र आज 3,000 रुपयांची मोठी घट झाली असून तो 93,500 रुपयांवर आला आहे.सोन्या-चांदीच्या किमतींमधील हे बदल आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या दरांशी संबंधित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ग्राहकांनी या किंमतींवर लक्ष ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे.दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याच्या किमतींमधील घसरण ग्राहकांसाठी(bigdrop inc) खरेदीसाठी चांगली संधी ठरू शकते. परंतु, पुढील काही दिवसांत किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
IPL झालं आता WPL 2025 लिलावाचा थरार रंगणार..
गाडीला धक्का देत होता तेवढ्यात ट्रॅक्टरखाली आला ड्रायव्हर, आधी चिरडला अन् मग… Video
भारताला मोठा झटका; स्वित्झर्लंडने काढून घेतला ‘Most Favoured Nation’ चा दर्जा