Vodafone-Idea युजर्ससाठी मोठी गुड न्यूज या 4 शहरांत सुरू होणार 5G सेवा

व्होडाफोन-आयडिया ने अखेर त्यांच्या 5G सेवांचा (launched)विस्तार सुरू केला असून, मुंबईनंतर आता चार नवीन शहरांमध्ये ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती शेअर करत वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे की, 5G साठी कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाहीत. बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमध्ये सुरू होणार Vi 5G Vi ने जाहीर केलं आहे की, लवकरच बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि पंजाब या चार प्रमुख राज्यांमध्ये त्यांची 5G सेवा सुरू होणार आहे. या सेवेमुळे वापरकर्त्यांना उच्च-गतीचा इंटरनेट अनुभव मिळेल. Vi सध्या त्यांच्या 5G नेटवर्कच्या बळकटीसाठी काम करत आहे.

5G साठी कोणताही अतिरिक्त खर्च नाही – निवडक प्लॅनवर लाभ
कंपनीने स्पष्ट केलं आहे की, 5G सेवा घेणाऱ्या पात्र ग्राहकांना कोणताही अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार नाही. हे लाभ त्या ग्राहकांना मिळणार आहेत, जे ₹299 किंवा (launched)अधिक किमतीच्या प्लॅनवर आहेत. याशिवाय, ₹451 च्या प्लॅन वापरणाऱ्यांनाही 5G सेवा मोफत मिळेल. मात्र, हे लक्षात घ्या की 5G डेटा संपूर्णपणे अमर्यादित नाही – प्रत्येक 28 दिवसांमध्ये 300GB पर्यंत डेटा वापराची मर्यादा असेल.

इतर कंपन्यांशी स्पर्धा आणि ग्राहक टिकवण्याचा प्रयत्न
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांनी देशात 5G सेवा बऱ्याच आधी सुरू केल्या आहेत. त्यांच्या तुलनेत Vi चे 5G रोलआउट खूपच उशिराने झाले असून त्यामुळे(launched) कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक गमवावे लागले. यामुळे Vi आता वेगाने 5G विस्तार करत असून ग्राहक टिकवण्यासाठी आकर्षक योजना आणत आहे.

हेही वाचा :

मजा बन गई सजा! घिबली ट्रेंडमुळे गोपनीतेला धोका, सायबर हल्ला होणार…

सूनबाई माझं म्हणणं नीट ऐकं लग्नाच्या दिवशी सासऱ्याने होणाऱ्या सूनेकडे अशी मागणी केली

महाराष्ट्र हादरला! बायको माहेरी गेल्याने सटकली; नवऱ्याने पत्नी आणि सासूला जिवंत पेट

मजा बन गई सजा! घिबली ट्रेंडमुळे गोपनीतेला धोका, सायबर हल्ला होणार…

अंबाबाईच्या दर्शनाआधी पंचगंगेत उतरले; पाण्यात उतरताच धाप लागली आणि… तरुणासोबत भयंकर घडलं