सरकारी नोकरीची मोठी संधी, रेल्वेत हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

सरकारी नोकरीच्या(job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड ने RRB भर्ती 2025 अंतर्गत 1036 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली असून आता उमेदवारांना 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी ही तारीख 6 फेब्रुवारी 2025 ही नियोजित होती. अधिकृत सूचनेनुसार, उमेदवारांना 18 फेब्रुवारीपर्यंत फी भरण्याची मुभा असेल आणि ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांच्या अर्जात सुधारणा करू शकतात.

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु?
पीजीटी (पदव्युत्तर शिक्षक)
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)
PRT (प्राथमिक शिक्षक)
संगीत शिक्षक
महिला कनिष्ठ शाळेतील शिक्षिका
महिला सहाय्यक शिक्षिका (प्राथमिक शाळा)
प्रयोगशाळा सहाय्यक
ग्रंथपाल
कनिष्ठ अनुवादक (हिंदी)

7 जानेवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु
अर्जाची सुरुवात: 7 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
फी भरण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2025
अर्ज बदलण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025
परीक्षेची पद्धत: संगणक आधारित चाचणी (CBT)

आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?
अधिसूचनेनुसार, पदव्युत्तर, पदवीधर आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. काही पदांसाठी विशेष डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक असू शकते.

वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 48 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार?
लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
कागदपत्रांची तपासणी
वैद्यकीय चाचणी

दरम्यान, जे युवक सरकारी नोकरीच्या(job) शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. 7 जानेवारापासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अनेक उमेदवारांना अर्ज भरता नाही आला, त्यामुळं रेल्वे विभागानं अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळं आता 16 फेब्रुवारीपर्यंत इच्छुक आण पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 6 फेब्रुवारी होती.

मात्र, त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. या निर्यामुळं इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ही परीक्षा लेखी चार टप्प्यात होणार आहे. सुरुवातीला लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची शाररिक चाचणी देखील होणार आहे. यामध्ये उमेदवार यशस्वी झाल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर शेवटी वैद्यकीय चाचणी होणार आहे.

हेही वाचा :

ठाकरेंना मोठा धक्का! राजन साळवींसह ‘ते’ दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर

तुम्ही खुशाल अतिक्रमणे करा, आम्ही ती निवांतपणे काढून टाकू

Kolhapur Accident : ओव्हरटेक करताना टेंपोखाली दुचाकी सापडून भाविक ठार