मोठी बातमी! विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यात 100 रोजगार मेळावे;

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे (youth)राज्यभरात १०० रोजगार मेळावे (प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन मेळावे) घेतले जाणार आहेत. या मेळाव्यांमधून सुमारे एक लाख सुशिक्षित तरूण-तरूणींना रोजगार तथा नोकरी देण्याचे नियोजन आहे.

मोठी बातमी! विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यात 100 रोजगार मेळावे; 1,00000 तरूणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट; शासकीय रिक्त पदे भरतीचेही नियोजन

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभरात १०० रोजगार मेळावे (प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन मेळावे) घेतले जाणार आहेत. या मेळाव्यांमधून सुमारे एक लाख सुशिक्षित तरूण-तरूणींना रोजगार तथा नोकरी देण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे आगामी तीन महिन्यात (youth) विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांच्या भरतीचेही नियोजन करण्यात आले आहे.

मागील नऊ वर्षांत राज्यातील तीन लाख तरूणांना रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या, पण २०१४-१५ ते २०१८-१९ च्या तुलनेत पुढील साडेचार वर्षांत रोजगार मेळावे व नोकरी मिळालेल्या तरूणांची संख्या निम्म्याने कमी झाल्याची स्थिती आहे. २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षांत ८६१ रोजगार मेळाव्यांमधून राज्यातील केवळ ९१ हजार तरूणांना नोकरी तथा रोजगार मिळाला. तत्पूर्वी, २०१४ ते २०१९ या काळात अकराशे रोजगार मेळाव्यांमधून राज्यातील दोन लाख तरूणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात (जून, जुलै ते ऑगस्टपर्यंत) किमान तीन रोजगार मेळावे होतील आणि त्यातून राज्यातील एक लाख तरूण- तरूणींना नोकऱ्या मिळतील, असे नियोजन अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यासंबंधीचे निर्देश दिल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. जेणेकरून विधानसभा निवडणुकीत हा विषय राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरणार नाही, हा त्यामागील हेतू असल्याचेही बोलले जात आहे.

ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तीन मेळाव्यांचे नियोजन

जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित तरूणांना रोजगार तथा नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने ३१ ऑगस्टपर्यंत किमान तीन रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्यांचे नियोजन होईल.

हेही वाचा :

इचलकरंजी महापालिकेची अतिक्रमण मोहीम दुसऱ्या दिवशीही सक्रिय; हातगाडे, फलक जप्त

सांगलीत चंद्रहार पाटील एकाकी? मतमोजणीसाठी उमेदवार प्रतिनिधीच नाही

T20 WC:उद्यापासून सुरू होतोय टी-२० वर्ल्डकप