कल्याणमधील योगीधाम परिसरातील सोसायटीतील मराठी कुटुंबाला मारहाण(Beating) करण्यात आली होती. त्याचे हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटल्यानंतर अखेर मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात. तुमचे मराठीपण बाहेर काढतो असं म्हणत मारहाण करण्यात आली होती.
एमटीडीसीमध्ये अकाऊंट मॅनेजरपदावर कार्यरत असणारा हा व्यक्ती खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरत होता. त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिल्याचंही समोर आलं आहे. सोसायटीतील नागरिकांना तो IAS अधिकारी असल्याचं सांगायचा आणि अरेरावी करायचा. या घटनेनंतर आता मराठी भाषिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्याच्यावर कारवाई करावी यासाठी शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर आली होती.
तुम्ही मराठी माणसं मोसे घाता, त्यामुळे तुमचा वास येतो, तुम्ही मराठी माणसं घाण अहात, अशी शेरेबाजी करत तीन मराठी भाषिकांवर सराईत गुंडांकडून हल्ला करण्याची आल्याची धक्कादायक घटना कल्याणमधल्या उच्चभ्रू सोसायटीत घडली होती. अखिलेश शुक्ला या एमटीडीसीमध्ये अकाऊंट मॅनेजरपदावर असलेल्या अधिकाऱ्याने ही मारहाण(Beating) केली होती.
शेजारच्या महिलेशी झालेल्या वादात दोघांनी मध्यस्थी केल्याच्या राग शुक्लाला होता. त्याने सराईत गुंडांना सांगून त्या तिघांना मारहाण केल्याचा आणि पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप पीडित रहिवाशांनी केला होता. या प्रकरणात पोलिसांनी किरकोळ गुन्हा दाखल करून या घटनेवर बोलण्यास टाळाटाळ केली होती.
कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाणीच्या घटनेचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनात उमटले. विरोधकांनी मराठी मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नीनं भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानीत होईल असे उद्गार काढले. ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अखिलेश शुक्ला एमटीडीसीचा कर्मचारी आहे. त्याच्या आणि त्याच्या पत्नीवर एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसेच पुढील तपास पोलीस करीत आहेत, असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता, आहे आणि यापुढेही राहणार. कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात. माज आल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही’, असं फडणवीसांन ठणकावून सांगितलं.
भाजप सत्तेत आल्यापासून मराठी माणसांवर अन्यायाच्या घटना वाढत असल्याचा आरोप काही विरोधकांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले, ‘भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं असा राजकीय रंग देण्याचं काही कारण नव्हतं. आपल्याला याचाही विचार करावा लागेल की मुंबईतील माणूस हद्दपार का झाला? कुणाच्या काळात झाला? का त्या माणसाला ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, याच्या पलिकडे जावं लागलं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा :
बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला मानसिक त्रास, शिवसेना ठाकरे गट आक्रमक
छगन भुजबळ मुंबईला रवाना, मोठा निर्णय घेणार?
बाईकवर आले, हातात 10 मोबाईल; संजय राऊतांच्या घराबाहेर काय घडलं?