मोठी बातमी! आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?, मतदारसंघही ठरला?

महाराष्ट्रातील विधानसभा(political journalism) निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. पुढच्या महिन्यात राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून विविध मतदारसंघांची(political journalism) चाचपणी केली जात आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे नेते अमित ठाकरे देखील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर, ते कोणत्या मतदारसंघातून लढणार याबाबतही सर्वकाही ठरलं असल्याचं बोललं जातंय.

अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असं म्हटलं जातंय. मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनही अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती.आता ते नेमक्या कोणत्या मतदार संघातून लढणार, याबाबत सर्वांचं लक्ष राहील.

मात्र, अद्याप मनसेकडून याला दुजारा देण्यात आलेला नाही. तरी, राजकीय वर्तुळात अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशा जोरदार चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे हे वरळी येथे ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांना आव्हान देणार, असं म्हटलं जात होतं. मात्र, आता ते माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असं म्हटलं जातंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जर अमित ठाकरे हे निवडणुकीत उतरले तर, त्यांना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळणार काय?, यावर सर्वांचं लक्ष राहील. कारण, आदित्य ठाकरे जेव्हा निवडणुकीसाठी उभे राहिले होते. तेव्हा मनसेकडून त्यांना वरळीत पाठिंबा देण्यात आला होता. 2019 च्या निवडणुकीत मनसेने वरळीत आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता.

हेही वाचा:

घटक पक्षांच्या गोटात भीती, यालाच म्हणतात शरद नीती

कोल्हापुरात अजूनही महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरुच; या तीन जागांवर घोडं अडलं!

मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली का? बच्चू कडू उत्तर देताना म्हणाले, ‘4 नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार’