मोठी बातमी! अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी

बॉलिवूड अभिनेता(actor) सोनू सूद अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरुद्ध लुधियाना कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट रमणप्रित कौर यांनी वॉरंट जारी केले आहे. न्यायालयात येऊन साक्ष देण्यासाठी सोनू सूदला वारंवार समन बजावण्यात आले होते. मात्र तो एकदाही हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने आता थेट अटक वॉरंटच जारी केले आहे.

लुधियानाती वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्ती विरुद्ध दहा लाख रुपयांच्या फसवणुकीचा खटला दाखल केला होता. यात नकली रिजिका कॉइनमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवले गेले होते. वकील खन्ना यांनी या प्रकरणात फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात अभिनेता सोनू सूदला साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते. यासाठी सोनूला अनेक समन बजावण्यात आले. पण सोनू काही न्यायालयात हजर राहिला नाही.

त्यामुळे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. ओशिवरा पोलीस स्टेशनला हे वॉरंट पाठवण्यात आले आहे. सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या प्रकरणी सोनू सूदने(actor) प्रतिक्रिया दिली आहे. हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. माझे या प्रकरणाशी काहीच देणेघेणे नाही असे त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मी कोणत्याही गोष्टीचा ब्रँड अॅम्बेसेडर नाही. मी वकिलांना याआधीच उत्तर दिलं आहे. आता 10 फेब्रुवारीला मी पुन्हा उत्तर देईन. या प्रकरणाची मला काहीच माहिती नाही. या प्रकरणात फक्त प्रसिद्धी करायची आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत असे सोनू सूद म्हणाला. आता 10 तारखेला सोनू सूद न्यायालयात हजर होऊन उत्तर देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्या बंद करा, अन्यथा…; अजित पवारांनी भरला दम

BSNL च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; कंपनीने आणले सर्वात स्वस्त प्लॅन

रांझा तेरा हीरिये: व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार नवीन रोमँटिक गाणं