मोठी बातमी! तब्बल ६ गावांचा मतदानावर बहिस्कार; काय आहे कारण?

महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी (ता. २६) दुसऱ्या टप्प्यातील मतदान(villages) पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अशातच अमरावतीमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेळघाटमधील तब्बल ६ गावातील नागरिकांनी मतदानावर बहिस्कार टाकला आहे.

मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत मेळघाटमधील ६ गावांनी मतदानावर(villages) बहिस्कार टाकल्याची माहिती आहे. सकाळपासून गावातील नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडलेले नाही. यामुळे मतदानाच्या आकडेवारीवर मोठा परिणाम होणार असून याचा फटका नेमका कोणत्या पक्षाला बसणार? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष पूर्ण झाली असताना आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे. मतदानावर बहिस्कार टाकलेल्या गावांमध्ये रंगबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, आणि खोपमार या गावातील नागरिकांचा समावेश आहे.

गेल्या ७७ वर्षांपासून आम्ही मूलभूत सुविधांपासून वंचित असून आम्ही निवडून दिलेले एक ही प्रतिनिधी आमच्या समस्यांच्या निराकरण करण्यास तत्पर दिसत नाही. पिण्याचे पाणी, विद्युत , पक्के रस्ते यासारख्या एकही सुविधा आम्हाला मिळाल्या नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधीकडे आम्ही मागणी केली असता आमच्या समस्यावर तोडगा निघाला नाही. जोपर्यंत आमच्या समस्या निकाली निघत नाहीत, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा तपोवन वर

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातून हार्दिक पांड्याला डच्चू?

कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा…, विशाल पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?