मोठी बातमी! रामदेव बाबांच्या पतंजलीला FSSAI चा दणका

योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फूड्‍सच्या(Foods) अडचणी वाढल्या आहेत. कंपनीच्या लाल मिरची पावडर माघारी घेण्याचे आदेश एफएसएसएआयने दिले आहेत. कंपनीच्या ए खास बॅचची लाल मिरची पावडर फूड रेग्यूलेटर एफएसएसएआयच्या निकषांची पूर्तता करू शकले नाही.

त्यामुळे या बॅचची मिरची पावडर माघारी बोलवा असे आदेश संस्थेने कंपनीला दिले आहेत. एफएसएसएआय (कंटेमिनेंट्स, टॉक्सिन्स अँड रेसिड्यूज) रेग्युलेशन 2011 च्या नियमांचे पालन बॅच नंबर AJD2400012 करत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पतंजली फूड्‍सच्या(Foods) या बॅचचे सर्व लाल मिरची पावडर बाजारातून माघारी घ्या अशा सूचना एफएसएसएआयने दिल्या आहेत. आता कंपनीला हे सर्व लाल मिरची पावडरे डबे, पॅकेट्स माघारी घ्यावे लागणार आहेत. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. एफएसएसएआयने 13 जानेवारी रोजी याबाबत एक आदेश जारी केला होता.

नियामकीय सूचनेत म्हटले आहे की खाद्य सुरक्षा आणि मानके विनिमय 2011 चे अनुपालन करण्याच्या कारणामुळे पतंजली फूड्स बॅच क्रमांक एजेडी 2400012 च्या लाल मिरची पावडरच्या (पॅक) पूर्ण बॅचला माघारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

पतंजली फूड्स रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद समुहाची एक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली होती. पतंजली ही देशातील प्रमुख एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे. याआधी या कंपनीला रचि सोया या नावाने ओळखले जात होते. कंपनी खाद्यतेल, खाद्य आणि एफएमसीजी तसेच पवन ऊर्जा उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. पतंजली रुची गोल्ड, न्यूट्रेला यांसारखे विविध ब्रँड अंतर्गत कंपनीकडून उत्पादनांची विक्री केली जाते.

सप्टेंबर तिमाहीत कंपनीला स्टँड अलोन नेट प्रॉफीट 21 टक्क्यांनी वाढून 308.97 कोटी झाला होता. मागील वर्षात याच काळात नफा 254.53 कोटी इतका राहिला होता. या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) उत्पन्नात वाढ होऊन 8198.52 कोटी रुपये झली. मागील वर्षात याच काळात कंपनीचं एकूण उत्पन्न 7 हजार 845.79 कोटी रुपये होतं.

हेही वाचा :

सामंजस्य कराराचे फलित, कोल्हापूर मात्र सदैव वंचित

डोनाल्ड ट्रम्प यांना झटका! वादग्रस्त नागरिकता आदेशावर न्यायालयाकडून स्थगिती

…म्हणून अजित पवार कांकाच्या बाजूला बसण्याऐवजी 1 खुर्ची सोडून बसले; खरं कारण पवारांनीच सांगितलं