अमरावती : भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा(politics) यांनी महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेटवर निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले होते. ते आव्हान अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी सोमवारी (दि.9) स्वीकारले. मात्र, त्यांनी हे आव्हान स्वीकारताना एक अट देखील घातली आहे.
राज्यात ईव्हीएमवरून चांगलेच वातावरण तापले आहे. याची धग अमरावतीपर्यंत पोहोचून वातावरण तापले आहे. नवनीत राणा यांनी निवडणूक आयोगाकडून लोकसभेची पोटनिवडणूक(politics) ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, असे लेखी पत्र आणून द्यावे. त्यानंतर आपण कधीही राजीनामा द्यायला तयार आहोत, अशी अट खासदार बळवंत वानखडे यांनी घातली आहे. सोमवारी बळवंत वानखडे यांनी एक व्हिडिओ जारी करून त्यामध्ये नवनीत राणा यांचे चॅलेंज आपण कोणीही बाहेर निघालो नाही. आम्ही संविधान मानणारे आहोत.
तसेच आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका येत असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील. एकदाचं बॅलेटवर मतदान होऊन जाऊ द्या, असेही नवनीत राणा म्हणाल्या होत्या.
महाविकास आघाडीला ईव्हीएमवर आक्षेप असेल तर अमरावतीच्या काँग्रेस खासदारांनी राजीनामा द्यावा, बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील. दोन्ही ठिकाणी बॅलेटवर मतदान घेण्यात यावे, असे आव्हान माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दिले होते. लोकसभेत महाविकास आघाडीच्या चांगल्या सीट्स निवडून आल्या. त्यावेळी ईव्हीएम बरोबर होते. तेव्हा लोकशाही जिवंत होती.
भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दिलेले राजीनामा देण्याचं आव्हान मी स्वीकारतो. मात्र, त्यांनी आधी मला निवडणूक आयोगाकडून लोकसभेची पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, असे लेखी पत्र आणून द्यावे. मी त्यानंतर कधीही, केव्हाही राजीनामा द्यायला तयार आहे. माझी ही केवळ एकच अट आहे. ती अट नवनीत राणा निवडणूक आयोगाकडून पूर्ण करून आणत असतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे खासदार बळवंत वानखडे आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
हेही वाचा :
शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…
लग्नाचं आमिष, अल्पवयीन मुलीला पळवून नेलं अन् मग नको तेच घडलं
पोलीस दलातील भ्रष्टाचार मीरा बोरवणकरांच चिंतन
पुष्पा 2 रिलीज होताच फॅन्सने भररस्त्यात बाईकला लावली आग Video Viral